Agriculture News in Marathi If the tide is sown, But how to save? | Agrowon

ज्वारी पेरली तर खरी,  पण वाचवायची कशी? 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे पिकाचे क्षेत्र कमी होत आहे. आता वन्यजीवांच्या त्रासामुळेही शेतकरी पेरणी न करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत.

अकोला : गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्वारीचे पिकाचे क्षेत्र कमी होत आहे. आता वन्यजीवांच्या त्रासामुळेही शेतकरी पेरणी न करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. यंदाच्या हंगामात लागवड केलेल्या ज्वारीच्या पिकाला रानडुकरांचा प्रचंड त्रास सुरू असून, साधारणतः महिनाभरानंतर काढणीला येऊ शकणारे पीक आजच नेस्तनाबूत होत आहे. 

दैनंदिन आहारात ज्वारीचे महत्त्व वाढल्याने बाजारात चांगला दर मिळत आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍नही ज्वारीच्या लागवडीमुळे सुटत असतो. शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड करावी यासाठी कृषी खाते प्रोत्साहन देते. हे सर्व काही होत असले, तरी शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना वन्यप्राणी आडकाठी आणत आहेत. 

यंदा जिल्ह्यात ज्वारीची लागवड चांगली वाढलेली आहे. वऱ्हाडात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक सात हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तर बुलडाणा ६६३६, वाशीम ७६६ हेक्टरवर पेरणी आहे. ज्वारीचे पीक सध्या कणसे धरण्याच्या अवस्थेत आहे. साधारणतः महिनाभरात ज्वारी पक्व होईल, अशी परिस्थिती आहे. परंतु नेमके याच काळात रानडुकरांचे थवे ज्वारीच्या पिकाचे नुकसान करीत आहेत. 

जंगलांना लागून असलेल्या काही किलोमीटर परिसरात ही रानडुकरे संख्येने अधिक आहेत. जिल्ह्यात खारपाण पट्ट्यात तर रानडुकरांनी आधी इतर पिकांना त्रास दिला. आता ज्वारीचे उभे पीक जमिनदोस्त करीत आहेत. शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करण्यासाठी दिवसरात्र पहारा द्यावा लागत आहे. थोडेही दुर्लक्ष झाले तर हे प्राणी पिकाचे नुकसान करतात. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांवरही हल्ले झाल्याच्या घटना दर वर्षी हंगामात घडत असतात. 

वन्यजीव विभाग काहीच करेना 
शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाच्या असंख्य तक्रारी असूनही वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. वन्यजीवांना बंदोबस्त केला जावा, यासाठी संबंधित विभागाकडून पुढाकाराची अपेक्षा असताना काहीही केले जात नसल्याचा आरोप सातत्याने शेतकरी करीत असतात. शेतांना कुंपणासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी अद्यापही लक्षात घेण्यात आलेली नाही. 

प्रतिक्रिया... 
मी दर वर्षी ज्वारी पिकाची लागवड करीत असतो. मी मागील वर्षी सहा एकर लागवड केली होती. गेल्या हंगामात काही प्रमाणात रानडुकरांनी नुकसान केले होते. म्हणून मी या वर्षी तीन एकरांवर ज्वारीची लागवड केली. पण या वर्षीही डुकरांनी ज्वारीचे पूर्ण पीक जमीनदोस्त केले आहे. असेच नुकसान होत राहिल्यास कुठलाही शेतकरी ज्वारी लावणार नाही. भविष्यात ज्वारीचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. वनविभागाने या डुकरांचा बंदोबस्त करावा तसेच शासनाने शेत कुंपणासाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे. 
- नकुल गजाननराव साबळे, शेतकरी, रा. तरोडा, ता. अकोट, जि. अकोला 


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...