मर्द असाल तर समोरून लढा : ठाकरे

मुंबई : ‘‘तुमचे मन सत्तेसाठी जळत असेल, तर मी तुमच्याकडे येतो. मला तुरुंगात टाका. मी कृष्णजन्माची वाट पाहीन, पण कुटुंबाला छळू नका, ज्या शिवसैनिकांनी १९९३ च्या दंगलीत मुंबई वाचविली, त्या शिवसैनिकांचा अपमान करू नका. हिंमत असेल तर समोरासमोर लढा,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.
If you are a man, fight in front: Thackeray
If you are a man, fight in front: Thackeray

मुंबई :  ‘‘तुमचे मन सत्तेसाठी जळत असेल, तर मी तुमच्याकडे येतो. मला तुरुंगात टाका. मी कृष्णजन्माची वाट पाहीन, पण कुटुंबाला छळू नका, ज्या शिवसैनिकांनी १९९३ च्या दंगलीत मुंबई वाचविली, त्या शिवसैनिकांचा अपमान करू नका. हिंमत असेल तर समोरासमोर लढा,’’ असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी भाजपवर बोचरी टीका केली.  

‘‘तुमच्या सकाळच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता किंवा आम्ही तुमच्या गळ्यात पट्टा बांधला असता, तर आज नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते. किंवा तुम्ही आमच्यासोबत बसला असता’’, अशी जहरी टीका ठाकरे यांनी केली. 

ठाकरे यांनी राज्यपालांच्या भाषणात आणलेल्या अडथळ्यांचा संदर्भ देत भाजपवर सुरू केलेल्या टीकेचा रोख शेवटपर्यंत कायम होता. सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी मुंबई महापालिकेतील कोविड काळातील कथित भ्रष्टाचार, वाइन विक्री, धारावी पुनर्विकास, मुदस्सर लांबे याची वक्फ बोर्डावरील नियुक्ती आदी विषयांवरून विरोधकांना सुनावले. 

ठाकरे म्हणाले, ‘‘राज्यपाल हे संविधानिक पद असतानाही त्यांच्या अभिभाषणावेळी झालेली घोषणाबाजी आणि गोंधळ निंदनीय आहे. शिवभोजन थाळीचा कोविड काळात आठ कोटी लोकांनी लाभ घेतला. मात्र, काहींना आरशात पाहिले तरीही भ्रष्टाचार दिसतो. यात दोष आरशाचा नसतो, त्याची घडणच तशी झालेली असते.’’

महाराष्ट्राचा मद्यराष्ट्र झाल्याचा उल्लेख विरोधकांनी केला होता, याचाही समाचार घेताना ठाकरे यांनी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक राज्यात दारूसाठी घेतलेल्या निर्णयांचा दाखला दिला. ‘‘‘ईडी’ला माहिती देणारे हेच आणि निकाल देऊन शिक्षा देणारेही हेच. हे सगळे पाहिले की ‘ईडी’ आहे की घरगडी असा प्रश्न पडतो. गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफटत आणू, असे सांगितले होते. आता काहीजण दाऊदच्या मागे फरफटत जात आहेत. ओबामाने ओसामाच्या नावाने मते मागितली नाहीत. त्याला संपवूनच बदला घेतला. तुम्ही मर्द असाल तर दाऊदला फरफटत आणा,’ असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले. पावसाळी अधिवेशन मुंबईत १८ जुलै २०२२ रोजी सुरू होईल, असे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जाहीर केले.

रावणाचा जीव बेंबीत, तसा काहींचा जीव मुंबईत 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावावर बोलताना मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून टीका केली होती. त्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ‘रावणाचा जीव ज्याप्रकारे बेंबीत होता, त्याप्रमाणे काही लोकांचा जीव मुंबईत अडकला आहे. मी पक्का मुंबईकर आहे. जगातील सर्वोत्तम आहे ते मी मुंबईत आणणार आहे. आठ भाषांतून शिक्षण देणारी ही एकमेव महापालिका आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com