पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची परवानगी द्या

मलकापूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कर्ज देणार नसाल तरकिडनी विक्रीची परवानगी मागितली आहे.
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची परवानगी द्या If you will not give peak loan Allow Kidney Sale
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची परवानगी द्या If you will not give peak loan Allow Kidney Sale

अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज भरता आलेले नाही. त्यामुळे या हंगामासाठी पैशांची सोय नाही. बँकांनी पीककर्ज द्यायला नकार दिल्याने मलकापूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कर्ज देणार नसाल तर  किडनी विक्रीची परवानगी मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाकोडी येथील दीपक महादेव पाटील, योगेश दशरथ काजळे, दीपकसिंह जगतसिंह गौर, सतीश शालीग्राम काजळे, नितीन बलदेव पवार या पाच शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवले. या निवदेनात म्हटले आहे की, आमचा मुख्य व्यवसाय शेती असून, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेतीच आहे. आम्हाला दर वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मलकापूर शाखा व जिल्हा सहकारी बँकेच्या लोणवडी ग्रामसेवा सहकारी संस्थेमार्फत पीककर्ज मिळत असते. मागील वर्षी पीककर्ज मिळाले होते. अतिवृष्टी व इतर नैसर्गिक कारणांमुळे घेतलेले पीककर्ज परत भरू शकलो नाही.  मागील वर्षांचे कर्ज थकीत असल्यामुळे बँकांनी यंदा पीककर्ज देण्यास नकार कळविला आहे. मागील वर्षाची जिल्ह्याची पैसेवारी ५०च्या आत आहे. बँकांनी पीककर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीककर्ज वाटप करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. हातात पैसेच नसल्याने शेतजमीन या वर्षी पडीक राहते की काय अशी शंका वाटते आहे. बँकांकडून मिळणारे पीककर्ज अत्यल्प असून, प्रती एकरी कोरडवाहू जमिनीस २० हजार रुपये व बागायती जमिनीस २५ हजार रुपये दिले जाते. पश्चिम महाराष्ट्रात हाच दर जास्त आहे. त्यामुळे जमिनीचे सरकारी किमतीच्या ५० टक्के कर्ज देण्यात यावे. तसे आदेश आपणामार्फत बँकांना देण्यात यावे. या मागणीची योग्य ती दखल घ्यावी व पीककर्जाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया आम्ही गेल्या वर्षी घेतलेले पीककर्ज नापिकीमुळे भरू शकलो  नाही. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने बँकांनी थकीत कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीककर्ज देण्याची आम्ही मागणी केली. शिवाय कोरडवाहू शेतीसाठी पीककर्जाची मर्यादासुद्धा वाढविण्याची मागणी केली. मात्र अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किडनी विक्रीची परवानगी मागितली आहे. - दीपक पाटील, शेतकरी, वाकोडी, जि. बुलडाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com