Agriculture news in marathi If you will not give peak loan Allow Kidney Sale | Page 3 ||| Agrowon

पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची परवानगी द्या

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जून 2021

 मलकापूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कर्ज देणार नसाल तर  किडनी विक्रीची परवानगी मागितली आहे.

अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज भरता आलेले नाही. त्यामुळे या हंगामासाठी पैशांची सोय नाही. बँकांनी पीककर्ज द्यायला नकार दिल्याने मलकापूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील वाकोडी येथील पाच शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत कर्ज देणार नसाल तर  किडनी विक्रीची परवानगी मागितली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

वाकोडी येथील दीपक महादेव पाटील, योगेश दशरथ काजळे, दीपकसिंह जगतसिंह गौर, सतीश शालीग्राम काजळे, नितीन बलदेव पवार या पाच शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवले. या निवदेनात म्हटले आहे की, आमचा मुख्य व्यवसाय शेती असून, उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेतीच आहे. आम्हाला दर वर्षी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मलकापूर शाखा व जिल्हा सहकारी बँकेच्या लोणवडी ग्रामसेवा सहकारी संस्थेमार्फत पीककर्ज मिळत असते. मागील वर्षी पीककर्ज मिळाले होते. अतिवृष्टी व इतर नैसर्गिक कारणांमुळे घेतलेले पीककर्ज परत भरू शकलो नाही. 

मागील वर्षांचे कर्ज थकीत असल्यामुळे बँकांनी यंदा पीककर्ज देण्यास नकार कळविला आहे. मागील वर्षाची जिल्ह्याची पैसेवारी ५०च्या आत आहे. बँकांनी पीककर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीककर्ज वाटप करणे गरजेचे होते. परंतु तसे झाले नाही. हातात पैसेच नसल्याने शेतजमीन या वर्षी पडीक राहते की काय अशी शंका वाटते आहे. बँकांकडून मिळणारे पीककर्ज अत्यल्प असून, प्रती एकरी कोरडवाहू जमिनीस २० हजार रुपये व बागायती जमिनीस २५ हजार रुपये दिले जाते. पश्चिम महाराष्ट्रात हाच दर जास्त आहे. त्यामुळे जमिनीचे सरकारी किमतीच्या ५० टक्के कर्ज देण्यात यावे. तसे आदेश आपणामार्फत बँकांना देण्यात यावे. या मागणीची योग्य ती दखल घ्यावी व पीककर्जाची मर्यादा वाढवून देण्यात यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया
आम्ही गेल्या वर्षी घेतलेले पीककर्ज नापिकीमुळे भरू शकलो 
नाही. यंदा दुष्काळी स्थिती असल्याने बँकांनी थकीत कर्जाचे पुनर्गठन करून नवीन पीककर्ज देण्याची आम्ही मागणी केली. शिवाय कोरडवाहू शेतीसाठी पीककर्जाची मर्यादासुद्धा वाढविण्याची मागणी केली. मात्र अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे किडनी विक्रीची परवानगी मागितली आहे.
- दीपक पाटील, शेतकरी, वाकोडी, जि. बुलडाणा


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
रत्नागिरीत पूर ओसरला, सावरण्याची धडपड ...रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून पूर...
विदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे...नागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता...
मराठवाड्यातील प्रकल्पांच्या जलसाठ्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७९ लघू, मध्यम, मोठ्या...
स्मार्ट तंत्रज्ञानाने मेंदू बथ्थड होत...आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस बथ्थड, मूर्ख होत...
कोल्हापुरात ६३ हजार हेक्टर पिकांना फटकाकोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे सुमारे...
परभणीत अतिवृष्टीने ३४ हजार हेक्टर पिके...परभणी ः अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे परभणी...
केंद्र सरकार घरे बांधून देणार : नारायण...रायगड/रत्नागिरी : ‘‘तळिये गावात पंतप्रधान आवास...
समृद्धीला समांतर बुलेट ट्रेनचा मार्ग बुलडाणा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगतच आता...
नगरमध्ये एक लाख हेक्टरवर सोयाबीन नगर : नगर जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी आता उरकली आहे...
साताऱ्यात भूस्खलनात आतापर्यंत ३२ जणांचा...सातारा : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात...
आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे,...
नदीकाठावरील ऊस वाहून गेलानेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या...
अकोल्यातील २३३६ कर्जदार सावकारी...अकोला : शासनाने जाहीर केलेल्या परवानाधारक सावकारी...
गोंदिया : पावसाअभावी दीड लाख हेक्‍...गोंदिया :  देशात मॉन्सूनचे आगमन होऊन दोन...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील...भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य...
नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी...सोलापूर : ‘‘यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण...
उस्मानाबाद जिल्ह्यात सोयाबीनमध्ये शंखी...बेलकुंड, जि. उस्मानाबाद जिल्ह्यात : बेलकुंड (ता....