agriculture news in Marathi ignore to cotton and maize msp Maharashtra | Agrowon

कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः रघुनाथदादा पाटील 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक आहे. परंतु या शेतीमालास सध्या हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे.

जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक आहे. परंतु या शेतीमालास सध्या हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे. प्रशासन, राजकीय पक्ष, शेतकऱ्यांशी निगडित संघटना यावर बोलत नाहीत, हे आणखी दुर्दैव आहे, असा दावा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. 

रघुनाथदादा हे संघटना बांधणीसह शेतकरी प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी खानदेशच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (ता.२३) धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते, शेतकरी प्रश्‍नांचे जाणकार यांच्याशी चर्चा केली. तेथे दोन तालुक्यांचे अध्यक्ष नेमले. शनिवारी (ता.२४) जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी पद्मालय विश्रामगृहात संवाद साधला. संघटनात्मक बाबी, पुढील कामाची दिशा याबाबत चर्चा केली. यानिमित्त पत्रकारांशी वार्तालाप केला. 

रघुनाथदादा म्हणाले, की कापूस, मक्याला हमीभाव नाही. शासकीय कापूस खरेदी सुरू करण्याच्या हालचाली कुठेही नाहीत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्‍नी ठिकठिकाणी लवकरच मका, कापूस परिषद घेणार आहे. त्यात या समस्यांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधू. राज्यात जे विरोधी पक्ष व राजकीय पक्ष आहेत, ते हमीभावाच्या प्रश्‍नाबाबत बोलत नाहीत. शेतकरी नेते म्हणविणारे राजू शेट्टी हे सत्तेतील मंडळीशी सलगी करून आहे.

सदाभाऊ खोत हे भाजपचे काम करतात. अशात शेतकरीप्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे. आम्ही त्या त्या भागातील जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक यांच्याकडे हमीभाव का मिळत नाही, यासंबंधीचे मुद्दे मांडू. ज्या बाजार समित्या हमीभावप्रश्‍नी काम करीत नाहीत, त्या बरखास्त करण्याची मागणी करू, असेही रघुनाथदादा म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यांवर...परभणी : अतिवृष्टिग्रस्त पिकांसाठी मंगळवार (...
नगर जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला वेग...नगर ः रब्बीची पेरणी सुरु होऊन एक महिन्याचा...
`जायकवाडी’तून रब्बीसाठी सुटले आवर्तनपरभणी : मराठवाड्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प...
तेल्हारा तालुक्यात मका, ज्वारीच्या...अकोला : जिल्ह्यात मका, ज्वारी पिकांचे सर्वाधिक...
मराठवाडा विभागातील ऊस गाळप हंगामाला गतीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद येथील प्रादेशिक...
धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र...गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या...
खानदेशात लाल कांद्याची आवक रखडलीजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजारांमध्ये कांद्याचे...
धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधित...शिंदखेडा, जि.धुळे : धुळे जिल्ह्यात जून ते...
देशव्यापी संपात २५ कोटी कर्मचारी सहभागीनवी दिल्ली : सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात...
भंडारा जिल्ह्यात धान खरेदी...भंडारा : हमीभाव केंद्राच्या मर्यादित संख्येमुळे...
सांगलीत हमाल पंचायतीतर्फे जोरदार...सांगली : कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे त्वरित...
पांढरकवडा येथे कापसाला ५ हजार ८२७...चंद्रपूर : बाजार समिती कार्यक्षेत्रातील...
पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...नांदेड : शेतीपिकांच्या नुकसानीपश्‍चात भरपाई...
अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे : अजित पवारपंढरपूर, जि. सोलापूर : कोरोना विषाणूवरील लस लवकर...
संत श्री नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा...हिंगोली ः श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे संत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...