agriculture news in Marathi ignore fraud for promotion Maharashtra | Agrowon

बढत्या देताना गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष 

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

राज्याच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना बढत्या देताना गैरव्यवहाराच्या मुद्द्यांकडे मंत्रालयातील ‘आयएएस लॉबी’ सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

पुणे: राज्याच्या कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना बढत्या देताना गैरव्यवहाराच्या मुद्द्यांकडे मंत्रालयातील ‘आयएएस लॉबी’ सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

कृषी खात्यात सध्या संचालक बढतीसाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यासाठी चार आयएएस अधिकाऱ्यांची समिती नेमकी काय भूमिका घेते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

बढत्यांच्या फाईल्सचा प्रवास आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाकडून कृषी सचिवालयात व तेथून सामान्य प्रशासन विभाग असा होतो आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून मंजुरी मिळाल्याशिवाय कृषी संचालक कोण ठरणार नाही. मात्र, या विभागाला आस्थापना मंडळाची मान्यता बंधनकारक असते. 

‘‘विदर्भात विविध कामांमध्ये घोटाळे करणाऱ्या एका अधिकाऱ्याला पदोन्नती देताना मागील कारनामे झाकण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे कागदपत्रे त्याच पद्धतीने तयार करण्यात आली आहेत. या अधिकाऱ्याबाबत आस्थापना मंडळ देखील गप्प बसले आहे,’’ असे एका जबाबदार अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

आस्थापना मंडळात फक्त ‘आयएएस’ अधिकारी आहेत. त्यात अल्पसंख्याक विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी, अर्थ सचिव राजीव कुमार मित्तल, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. 

कृषी आयुक्तालयात सध्या गुणनियंत्रण संचालकपदासाठी सर्वांत जास्त रस्सीखेच आहे. या पदावर सहसंचालक दिलीप झेंडे यांना बढती मिळण्याची शक्यता जास्त आहे, असे अधिकारी सांगतात. दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र विकास संचालकपदासाठी आहे. अमरावतीचे सहसंचालक सुभाष नागरे यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. 

विस्तार संचालकपदी कोकणचे सहसंचालक विकास पाटील तर फलोत्पादन संचालकपदी डॉ. कैलास मोते यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘‘कोणत्या सहसंचालकाला कोणते पद मिळेल हे शेवटपर्यंत निश्चित होत नाही. कारण, गुणनियंत्रण विभागाच्या संचालकपदाची निवड शेवटच्या दिवशी बदलण्यात आली होती,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मंत्रालयातून आलेल्या फाईलवरच निर्णय 
बढत्या देताना आस्थापना मंडळ स्वतःहून काहीही मुद्दा उपस्थित करीत नाही. कृषी मंत्रालयातून आलेल्या फाईलवरच निर्णय होतो. त्यामुळे मंत्रालयात जाणारी फाईल ‘टापटीप’ कशी राहील याची दखल आस्थापना विभाग घेतो. या विभागाची ‘काळजी’ अधिकारी घेतात. त्यामुळे गैरव्यवहार, निलंबन, चौकशी असा पूर्वेतिहास असूनही संचालकपदी बढती दिली जाते, अशी माहिती प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली. 
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...