माहितीस टाळाटाळ; ग्रामसेविकेला दंड

सामाजिक कार्यकर्त्याने विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी डिकसळ येथील ग्रामसेविका वैशाली औटी यांना नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्‍नोई यांनी १५ हजारांचा दंड केला.
grampanchayat
grampanchayat

पारनेर, जि. नगर ः सामाजिक कार्यकर्त्याने विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी डिकसळ येथील ग्रामसेविका वैशाली औटी यांना नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्‍नोई यांनी १५ हजारांचा दंड केला. त्यांच्या पगारातून दोन हप्त्यांत हा दंड वसूल करावा, असे आदेशात म्हटले आहे. 

डिकसळ येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अरुण काकडे यांनी ग्रामसेविका औटी यांच्याकडे माहिती मिळण्यासाठी जानेवारी २०१७मध्ये अर्ज केला होता. त्यासाठीचे शुल्क भरूनही माहिती न दिल्याने, त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी आदेश देऊनही औटी यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे काकडे यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील केले. माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल औटी यांना १५ हजारांचा दंड करण्यात आला. औटी यांच्या पगारातून दोन हप्त्यांत हा दंड वसूल करून तो सरकारी तिजोरीत जमा करावा, असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com