agriculture news in Marathi ignore to information fine to gramsevika Maharashtra | Page 2 ||| Agrowon

माहितीस टाळाटाळ; ग्रामसेविकेला दंड

टीम अॅग्रोवन
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

 सामाजिक कार्यकर्त्याने विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी डिकसळ येथील ग्रामसेविका वैशाली औटी यांना नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्‍नोई यांनी १५ हजारांचा दंड केला.

पारनेर, जि. नगर ः सामाजिक कार्यकर्त्याने विचारलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी डिकसळ येथील ग्रामसेविका वैशाली औटी यांना नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्‍नोई यांनी १५ हजारांचा दंड केला. त्यांच्या पगारातून दोन हप्त्यांत हा दंड वसूल करावा, असे आदेशात म्हटले आहे. 

डिकसळ येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अरुण काकडे यांनी ग्रामसेविका औटी यांच्याकडे माहिती मिळण्यासाठी जानेवारी २०१७मध्ये अर्ज केला होता. त्यासाठीचे शुल्क भरूनही माहिती न दिल्याने, त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांनी आदेश देऊनही औटी यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे काकडे यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील केले.

माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल औटी यांना १५ हजारांचा दंड करण्यात आला. औटी यांच्या पगारातून दोन हप्त्यांत हा दंड वसूल करून तो सरकारी तिजोरीत जमा करावा, असा आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...