नगरच्या शेवगावात वीजबिल थकबाकीकडे दुर्लक्ष

नगर : जायकवाडी धरणातून शेवगाव तालुक्‍यातील गावांना चार पाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनांची वीजबिल थकबाकी ६ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे.
Ignoring electricity bill arrears in Shevgaon of the town
Ignoring electricity bill arrears in Shevgaon of the town

नगर : जायकवाडी धरणातून शेवगाव तालुक्‍यातील गावांना चार पाणी योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या योजनांची वीजबिल थकबाकी ६ कोटी ६२ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे महावितरणने वीजपुरवठा तोडला आहे. संबंधित ग्रामपंचायती व नगरपालिकांना काही देणेघेणे नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. 

महावितरणच्या पथकाने थकबाकीमुळे मंगळवारी (ता.१६) शेवगाव-पाथर्डी व ५४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दहिफळ येथील जॅकवेल, खंडोबामाळ, अमरापूर पंपहाऊसचा वीजपुरवठा खंडित केला. या योजनेची दोन कोटी ४९ लाख सात हजार रुपये थकबाकी आहे. 

शहरटाकळी व २४ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना ज्ञानेश्‍वर संयुक्त पाणीपुरवठा समिती चालवते. या योजनेच्या कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची एक कोटी आठ लाख रुपये मागील, तर ३४ लाख ९२ हजार चालू थकबाकी आहे. हातगाव व २८ गावांना पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे आहे. या योजनेच्या कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व राक्षी येथील पंपहाऊसची मिळून १ कोटी ७३ लाख थकबाकी आहे, तर ७७ लाख ५२ हजार चालू बाकी आहे. 

बोधेगाव व सात गावे ही योजना संबंधित ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या समितीमार्फत चालवली जाते. या योजनेच्या कऱ्हेटाकळी येथील जॅकवेल व सोनेसांगवी येथील पंपहाऊसची १ कोटी १३ लाख थकबाकी, तर ३८ लाख ८८ हजार चालू बाकी आहे. या योजनेची वार्षिक वसुली १७ लाख रुपये आहे. मात्र यावर्षी फक्त १३ लाख ५०० रुपये वसुली झाली आहे.

‘शेवगाव-पाथर्डी’ची थकबाकी 

शेवगाव नगरपरिषद- २ कोटी ८० लाख ६० हजार ८१५ रुपये, पाथर्डी नगरपरिषद- ८७ लाख २८ हजार ३३५ रुपये, शेवगाव तालुक्‍यातील ग्रामपंचायती- एक कोटी ८७ लाख ६६ हजार ४५६ रुपये, पाथर्डी तालुक्‍यातील ग्रामपंचायतीकडे एक कोटी नऊ लाख ९४ हजार ९९० रुपये थकबाकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com