agriculture news in marathi, Ignoring the fodder due to elections; Stock of animals | Agrowon

निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष; जनावरांचे हाल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वाढलेल्या पाणी-चाराटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनासह, लोक प्रतिनिधिनीसह दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जनावरांसाठी चाऱ्यांचा मोठा प्रश्न भेडसावू लागला आहे. नगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे या भागातूनही मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येऊ लागली आहे.  

पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वाढलेल्या पाणी-चाराटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनासह, लोक प्रतिनिधिनीसह दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जनावरांसाठी चाऱ्यांचा मोठा प्रश्न भेडसावू लागला आहे. नगर जिल्ह्यासह सोलापूर, पुणे या भागातूनही मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येऊ लागली आहे.  

 उन्हाचा चटका वाढू लागल्याने पाणी टंचाईची झळ चांगलीच बसू लागली आहे. यामुळे हिरवा चारा उपलब्ध होण्याचे बंद झाले आहे. वाळलेल्या चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. चाराटंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना जनावरे विकण्याची वेळ आली आहे. दुष्काळामुळे रब्बी हंगामात अवघ्या ९१ हजार २१० हेक्टरवर चारा पिकांची पेरणी होती. त्यातच साखर कारखाने बंद झाल्याने हिरवा चाराही महाग झाला असून तो मिळेनासा झाला आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चारा छावण्या सुरू झाल्या आहेत.  सोलापूर, पुणे या भागातही अजूनही छावण्या सुरू झाल्या नसल्या तरी चारा टंचाई चांगलीच सुरू झाली आहे. पुणे विभागात दरवर्षी १ लाखांहून अधिक क्षेत्रावर मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड होत होती. लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्याचे उत्पादन होते. काही शेतकरी उत्पादन झालेला चारा वाळवून तो टप्प्याटप्प्याने वापरतात. त्यामुळे उन्हाळ्यात चाराटंचाई कमी होण्यास मदत होत होती. 

उन्हाळी हंगामात कमी चारा पिके
दरवर्षी मे, जून आणि जुलै महिन्यात चारा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळी हंगामात मार्च महिन्यात विविध चारा पिकांची लागवड करतात. चारा पिकांच्या लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या तोंडावर चारा टंचाई कमी होण्यास मदत होत होते. मात्र, उन्हाळी हंगामात पाणी टंचाईमुळे अवघ्या ११ हजार ४८५ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पादन घट होऊन पुढील दोन महिन्यांत चाऱ्यांचा मोठा प्रश्न उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 
 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...