आयआयटीतील व्यवस्थापन पदवीधरांना लाखांचे 'पॅकेज'
आयआयटीतील व्यवस्थापन पदवीधरांना लाखांचे 'पॅकेज'

आयआयटीतील व्यवस्थापन पदवीधरांना लाखांचे 'पॅकेज'

मुंबई, : आयआयटी मुंबईतील शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांना "कॅम्पस प्लेसमेंट'मध्ये उच्च वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. या प्रक्रियेत १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या; काही जणांना तर तब्बल ३२.४ लाखांचे वार्षिक "पॅकेज' मिळाले. मागील वर्षाच्या तुलनेत वेतनात भरघोस वाढ झाली आहे. आयआयटीमधील व्यवस्थापन शाखेच्या ११२ पदवीधरांना नोकऱ्या मिळाल्या. त्यांना सरासरी २० लाखांपासून पुढे वार्षिक वेतन मिळणार आहे. गतवर्षी सरासरी १९.०६ लाखांचे "पॅकेज' मिळाले होते. "कॅम्पस इंटरव्ह्यू'मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन, जीईपी कन्सल्टिंग, नेस्ले, पी. अँड जी., गुगल, लॉरिअल, येस बॅंक, झूमकार, कोलगेट, ईवाय आदी ३८ कंपन्या सहभागी झाल्या होत्या. एचडीएफसी, ओयो, एचएसबीसी, टाटा ग्लोबल बिव्हरेज या कंपन्या प्रथमच सहभागी झाल्या होत्या. आयआयटी मुंबईच्या शैलेश जे. मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील पदवीधरांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, हे पुन्हा सिद्ध झाले आहे, असे संस्थेचे प्रमुख प्रा. एस. भार्गव म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com