‘आयआयटीएम’ देणार दशकाचा हवामान अंदाजः एम. राजीवन

‘आयआयटीएम’ देणार दशकाचा हवामान अंदाजः एम. राजीवन
‘आयआयटीएम’ देणार दशकाचा हवामान अंदाजः एम. राजीवन

पुणे: देशाची धोरणे, पंचवार्षिक योजना ठरवताना हवामानातील बदलांचा विचारही करणे आवश्यक आहे. त्यामुळे हवामान विभागातर्फे दशकासाठीचा हवामान अंदाज देण्यात येणार आहे. भारतीय उष्णकटींबधीय हवामान संस्थेच्या (आयआयटीएम) माध्यमातून देण्यात येणाऱ्या अंदाजामुळे दशकात हवामानात होणारे संभाव्य बदल, पावसाची शक्यता, तापमान याचा विचार करून धोरणे ठरवणे शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी दिली. 

‘आयआयटीएम’मध्ये आयोजित केलेल्या हवामान सेवांविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद् घाटनानंतर राजीवन पत्रकारांशी बोलत होते. हवामान विभागाचे महासंचालक एम. मोहपात्रा, ‘आयआयटीएम’चे संचालक आर. नंजुनदाह आदी उपस्थित होते. 

राजीवन म्हणाले, ‘‘आयआयटीएम’च्या वतीने चालू शतकाच्या शेवटपर्यंतच्या हवामान स्थितीविषयी अंदाज देण्यात आला आहे. देशाचे तापमान किती वाढेल, पाऊस कमी होईल की अधिक होईल, याचा विचार करण्यात आला आहे. मात्र सध्या दशकाच्या हवामान अंदाजाचा सध्या अधिक उपयोगी ठरणार आहे. हा अंदाज देण्यासाठी समुद्रातील हवामान नोंदीचा आधार घेऊन हा अंदाज देण्यात येईल.’’ 

एम. मोहपात्रा म्हणाले, ‘‘या वर्षी दक्षिण भारतात हिवाळ्यात थंडीची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज देण्यात आला होता. त्यानुसार दक्षिण भारतात हवामान उबदार राहिले आहे. थंडीच्या लाटा कमी होत्या, जानेवारी महिन्यात तर लाटा आल्याच नाहीत. सातत्याने येणाऱ्या पश्चिमी चक्रावातांमुळे उत्तरेकडून कोरडे व थंड वारे दक्षिणेकडे आलेच नाहीत. त्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढूनही दक्षिण भारतात गारठा वाढला नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत उन्हाळा हंगामासाठीचा अंदाज देण्यात येईल. जागतिक हवामान संघटनेने भारतातील पुणे, कुलाबा (मुंबई), चेन्नई, पणजी, तिरुअनंतपुरम या पाच हवामान केंद्रांना १०० वर्षापेक्षा अधिक काळ हवामान माहिती गोळा करणारी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. देशाच्या भूभागावरील आणखी पाच केंद्रांची आणि २० वर्ष सातत्याने हवामान नोंदी घेणाऱ्या समुद्रातील पाच केंद्रांची यासाठी शिफारस करण्यात येणार आहे.’’  सौम्य ‘एल निनो’ स्थिती शक्य  प्रशांत महासागरात सौम्य ‘एल निनो’ स्थिती किंवा सर्वसाधारण स्थिती राहण्याची शक्यता आहे; तसेच काही हवामान प्रणालीच्या अंदाजानुसार यंदा इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सकारात्मक (पॉझिटिव्ह) राहण्याची चिन्हे आहेत. ही बाब भारतातील मॉन्सूनसाठी लाभदायक आहे. मात्र याबाबत आताच बोलणे घाईचे ठरेल, असे राजीवन यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com