कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा जप्त

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोरेटची खरेदी विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून प्रतिबंधित फोरेटचा साठा पकडला.
 कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा जप्त Illegal in Aquarius Seizure of pesticide stocks
कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा जप्त Illegal in Aquarius Seizure of pesticide stocks

कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फोरेटसारख्या काही घातक कीटकनाशकांवर बंदी घातलेली आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून फोरेटची खरेदी विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून प्रतिबंधित फोरेटचा साठा पकडला. संबंधित फोरेटवरील उत्पादक कंपनीचे नाव शंकास्पद असल्याने संशयास्पद फोरेटचा नमुना पुढील विश्लेषणासाठी पुणे येथे पाठविला आहे.   तपासणीनंतर या फोरेटमध्ये सक्रिय घटक शून्य आढळला, तो दहा टक्के असायला पाहिजे होता. उत्पादक कंपनी जे. सी. बी. क्रॉपे सायन्स, वापी, गुजरात व पुरवठादार कंपनी गुजरात किसान फर्टिलायझर कंपनी, राजकोट यांनी महाराष्ट्र शासनाचा कोणताही परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तंत्र अधिकारी बंडा कुंभार यांच्या रीतसर फियार्दीवरून संबंधित कंपनी व बापूसो कृषी सेवा केंद्राचे चालक  मदन लक्ष्मण अनुसे यांच्यावर हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांसमवेत विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, राज्यस्तरीय पथकातील उपसंचालक अशोक बाणखेले, कीटकनाशक निरीक्षक प्रवीण कदम, बंडा कुंभार व प्रल्हाद साळुखे यांनी १८७ किलो अप्रमाणीत फोरेटची जप्ती केली. पुढील अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत. कोणीही सोशल मीडियावरील भूलथापांना बळी न पडू नये. कायद्याने नोंद व शिफारस केलेल्या कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक कंपनी वा डिलरकडून करण्याचे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com