Agriculture news in marathi Illegal in Aquarius Seizure of pesticide stocks | Page 2 ||| Agrowon

कुंभोजमध्ये बेकायदा  कीटकनाशकाचा साठा जप्त

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोरेटची खरेदी विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून प्रतिबंधित फोरेटचा साठा पकडला.

कोल्हापूर : केंद्र शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फोरेटसारख्या काही घातक कीटकनाशकांवर बंदी घातलेली आहे. परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून फोरेटची खरेदी विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय भरारी पथकाने कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून प्रतिबंधित फोरेटचा साठा पकडला. संबंधित फोरेटवरील उत्पादक कंपनीचे नाव शंकास्पद असल्याने संशयास्पद फोरेटचा नमुना पुढील विश्लेषणासाठी पुणे येथे पाठविला आहे. 

 तपासणीनंतर या फोरेटमध्ये सक्रिय घटक शून्य आढळला, तो दहा टक्के असायला पाहिजे होता. उत्पादक कंपनी जे. सी. बी. क्रॉपे सायन्स, वापी, गुजरात व पुरवठादार कंपनी गुजरात किसान फर्टिलायझर कंपनी, राजकोट यांनी महाराष्ट्र शासनाचा कोणताही परवाना घेतला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तंत्र अधिकारी बंडा कुंभार यांच्या रीतसर फियार्दीवरून संबंधित कंपनी व बापूसो कृषी सेवा केंद्राचे चालक  मदन लक्ष्मण अनुसे यांच्यावर हातकणंगले पोलिसात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांसमवेत विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, राज्यस्तरीय पथकातील उपसंचालक अशोक बाणखेले, कीटकनाशक निरीक्षक प्रवीण कदम, बंडा कुंभार व प्रल्हाद साळुखे यांनी १८७ किलो अप्रमाणीत फोरेटची जप्ती केली. पुढील अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत. कोणीही सोशल मीडियावरील भूलथापांना बळी न पडू नये. कायद्याने नोंद व शिफारस केलेल्या कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक कंपनी वा डिलरकडून करण्याचे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी केले आहे.


इतर बातम्या
सत्तावीस कीडनाशकांच्या बंदीविषयी अहवाल...पुणे ः केंद्रीय कृषी मंत्रालयाने मागील वर्षी...
पंतप्रधान आवास योजनेसाठी ११ लाख नावे...नगर ः ग्रामीण भागातील गरीब, अल्पभूधारक, घर...
राज्यात 'शेतमाल तारणा'तून २७ कोटी...पुणे ः कृषी पणन मंडळाद्वारे बाजार समित्यांद्वारा...
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
अमरावती : निकृष्ट बियाणेप्रकरणी भरपाईचे...अमरावती ः निकृष्ट बियाण्यासंदर्भाने तालुकास्तरीय...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
सात-बारासह फेरफारही मिळणार आता ऑनलाइन...पुणे : शेती संबंधीच्या दस्ताऐवजांची संगणकीकृत...
सांगली : पूरबाधितांच्या पंचनाम्यांचा...सांगली : महापुरानंतर आता नुकसानीचे पंचनामे सुरू...
अतिवृष्टीने नुकसान; ३४ हजारांवर अर्जअकोला : गेल्या महिन्यात जिल्ह्यात तीन दिवस...
जमीन अधिग्रहणाला विरोध; आळेफाट्यावर...आळेफाटा, जि. पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड...
नगरमध्ये मिळाला पीकविमा; श्रेयासाठी...नगर : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गेल्या...
पदविकाधारकांना खासगी पशुवैद्यकीय...अकोला : दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन...
राळेगावमध्ये कपाशीवर बोंडअळीचा...राळेगाव, जि. यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्य पीक...
परभणीत ४४६ कोटी ५९ लाख रुपये वितरणपरभणी ः चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२) जुलै...
अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी...भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०...
डाळ व्यापाऱ्याची चार कोटींनी फसवणूक नागपूर : डाळ व्यापाऱ्याला आमिष दाखवून साखरेच्या...
महसूली प्रकरणांचा निपटारा तीन टप्प्यांत...नाशिक : सेवाहक्कांतर्गत १००पेक्षा अधिक व राज्यात...