बीटी तस्करांकडून शेतकऱ्याची हत्या?

बीटी तस्करांकडून शेतकऱ्याची हत्या?
बीटी तस्करांकडून शेतकऱ्याची हत्या?

यवतमाळ :  बीटी कापूस बियाणे खरेदीसाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे गेलेल्या शेतकऱ्याला बीटी तस्करांनी पैसे हिसकावत विष देऊन मारल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मृतकाच्या भावाने आदिलाबाद पोलिसात तक्रार दिली असून, याप्रकरणी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.  अनधिकृत कृषी निविष्ठांच्या विक्रीचे तेलंगण मोठे केंद्र आहे. या राज्याच्या सीमेलगत असलेल्या चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांत गेल्या हंगामात मोठ्या प्रमाणावर एच.टी. कापूस बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला होता. या वर्षी देखील तस्करांकडून हंगामात बियाणे विक्रीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. स्वस्तात बीटी उपलब्धतेचा दावा त्यासाठी केला जातो. याच दाव्याला भुलत राळेगाव तालुक्‍यातील पिंपरी दुर्ग येथील अमित इंगोले हे सधन शेतकरी ३० मे रोजी आदिलाबाद येथे गेले होते. बीटी तस्करांशी भेटीनंतर त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची रोकड घेण्यात आली.   त्यानंतर त्यांना हैदराबाद ते नागपूर हायवेलगतच्या आदिलाबाद शहरात जाणाऱ्या बायपासवर थांबण्याचा सल्ला देण्यात आला आणि बियाणे तस्कर निघून गेले. भेटीत तस्करांनी इंगोले यांना पिण्यासाठी कोल्ड्रिंक दिले होते. कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर तोंडातून फेस येत असल्यामुळे आपला घातपात झाल्याचे इंगोले यांच्या लक्षात आले. त्यांनी हा प्रकार तत्काळ आपला लहान भाऊ आशिषला मोबाईलवरून सांगितला. परंतु दवाखान्यात जाण्याअगोदर संपूर्ण शरिरात विष भिनल्याने अमोलचा काही वेळातच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन शवविच्छेदनाअंती मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. त्यानंतर मृतकाच्या भावाने याप्रकरणी आदिलाबाद पोलिसात तक्रार देत बीटी बियाणे तस्करांनी आपल्या भावाची हत्या केल्याचा आरोप यातून केला आहे. आदिलाबाद पोलिसा याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com