agriculture news in Marathi illegal deduction in cotton in Nagar Maharashtra | Agrowon

‘कवडी’च्या नावाखाली कापसाच्या वजनात अनाधिकृत कपात 

सुर्यकांत नेटके
रविवार, 3 मे 2020

चापडगाव (ता. शेवगाव) येथील सरकारी कापुस खरेदी केंद्रावर माझ्या कापसाच्या भरलेल्या गाडीचे वजन करुन गाडी खाली केल्यानंतर मोकळ्या गाडीत पन्नास ते साठ किलो वजनाची व्यक्ती उभी करुन वजन केले. म्हणजे आपोआप कापसाचे वजन कमी झाले. त्यांची कोणत्याही पावतीवर नोंद नाही. विशेष म्हणजे माझा खराब कापसाच्या नऊ गोण्या परत दिल्या, तर मग कापसाची कपात केली कशासाठी? सरकारी पातळीवर याची गांभिर्याने दखल घेऊन शेतकऱ्याची लुट थांबली पाहिजे. 
- लहु नामदेव जायभाय, कापुस उत्पादक शेतकरी, थाटे वडगाव, ता. शेवगाव 

नगर : कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर दिड महिन्यापासून कापूस विक्री करता आली नाही. आता खरेदी केंद्रे सुरु झाली खरी, मात्र कापसाचा दर्जा घसरला आणि कापसात ‘कवडी’ असल्याचे कारण पुढे करत वजनात कपात केली जात आहे. कापसाची खरेदी करुन ग्रेड नुसार दर लावण्याएवजी मोकळ्या वाहनाचे वजन वाढवून थेट अनाधिकृत कपात केली जात आहे. 

शेतकऱ्यांना दिलेल्या पावतीवर कपात केलेल्या कापसाची पावतीवर मात्र नोंद दिसत नाही. त्यामुळे नगर जिल्ह्यात कापूस उत्पादकांची राजरोसपणे लुट केली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकाराने कोरोना सारख्या संकटात नगर जिल्ह्यात कापुस उत्पादकांची आवस्था आगीतून फुपाट्यात गेल्यासारखी झाली असून बाजार समिती आणि प्रशासनाने मात्र कानावर हात ठेवले आहेत. 

नगर जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव, नेवासा, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे याभागातील शेतकऱयांच्या कापसाची खरेदी करण्यासाठी चापडगाव ता. शेवगाव व मिरजगाव ता. कर्जत येथे कापुस राज्य पणन महासंघाने सरकारी कापुस खरेदी केंद्र सुरु केले. मात्र कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून ही केंद्रे बंद होती. त्यामुळे कापुस उत्पादकांची शेकडो वाहने येथे अडकून पडली होती. शिवाय शेतकऱ्यांच्या घरातही कापूस पडून आहे. आता गेल्या आठवड्यात ही केंद्रे सुरु झाली आहेत. 

मात्र कापुस खरेदी सुरु केल्यानंतर मात्र त्रासलेल्या शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा उचलत खरेदी केंद्रावर कवडी कापसाच्या नावाखाली कापसाची अनाधिकृत कपात सुरु केली जात आहे. प्रत्येक गाडी, वाहनामागे ठरलेल्या कापसाचे वजन कमी करून घेण्यासाठी वजन काट्यावर चक्क माणसे उभी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकारही उघड झाला आहे. मुळात एप्रिलमधील दर्जाचा कापसाची मे मध्ये खरेदी करण्याचे सरकारचे आदेश आहेत. चापडगाव केंद्रावर हा प्रकार उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. 

कापसाचे वजन करताना मोकळ्या गाडीत माणसं उभी केली जात असताना अचुक वजनाची जबाबदारी असलेल्या बाजार समितीचे याकडे सोयस्कर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. आता आतापर्यत किती शेतकऱ्याची राजरोस लुट केली, याचा अंदाज लावला जात आहे. हा प्रकार थेट पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यापर्यत नेणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या संमतीने कापसाची कपात केली जात असल्याच्या प्रकाराला येथील ग्रेडरने दुजोरा दिला. कापूस कपात शेतकरी संमतीने केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. चापडगाव कापुस खरेदी केंद्रावरील लुट केल्याबाबतचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...