Agriculture news in marathi Illegal excavations on Brahmagiri mountain; Wildlife, biodiversity under threat | Page 2 ||| Agrowon

ब्रह्मगिरी पर्वतावर अवैध उत्खनन; वन्यजीव, जैवविविधता धोक्यात

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जून 2021

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत अवैध उत्खननामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याचा धोका आहे. तरीही वन, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरी येथे उत्खननाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
 

नाशिक : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेत अवैध उत्खननामुळे माळीण सारखी दुर्घटना होण्याचा धोका आहे. तरीही वन, महसूल विभाग, खनिकर्म अधिकारी, जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ब्रह्मगिरी येथे उत्खननाचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र असणाऱ्या नाशिक जवळच्या संतोषा, भागडी पर्वतरांगेत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध उत्खननाने संपूर्ण डोंगरच नेस्तनाबूत केलेला आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवैध उत्खननाने सह्याद्रीचे लचके तोडले जात आहेत. त्यामुळे वन्यजीव, पर्यावरण, जैवविविधतेचे कधीही भरून न येणारे नुकसान होऊन संपूर्ण जीवसृष्टीस धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार पर्यावरणवादी कार्यकर्ते व ब्रम्हगिरी कृती समितीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या संबंधी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

    ब्रह्मगिरी आणि सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या उत्खननाबाबत ब्रम्हगिरी कृती समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.१८) भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी ब्रम्हगिरी बचाव समितीचे निशिकांत पगारे, महंत गणेशानंद सरस्वती, दत्तात्रय ढगे, जगबिरसिंह, प्रकाश निकुंभ, कुलदीप कौर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

          निवेदनात म्हटले आहे, ‘‘युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील पहिला किल्ला ब्रह्मगिरी मेटघर आहे. येथे सुपलीचा मेट या आदिवासी बांधवांच्या पाड्याखाली जिलेटिन कांड्यांचा वापर करून सुरुंग लावून ब्रह्मगिरीच्या पोटात ''ब्रम्हा ग्रीन'' या प्रकल्पांतर्गत खासगी विकासकाने पेसा व वनहक्क कायद्यांचा भंग करून अवैध उत्खनन केले आहे. युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक वारसा यादीत असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगेचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. 

सह्याद्री पर्वतरांगेत आता सुरुंग, जिलेटीन कांड्यांचा वापर, खोदकाम, खाणकाम बांधकास पूर्णतः बंदी आणावी. आदिवासी बांधवांच्या न्याय्य हक्काचे रक्षण करून योग्य तो कायदा करून सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगर उतारावरील जमिनीचा राज्याचे हरित अच्छादन ३३ टक्के वाढवावे. त्यासाठी कायद्याचा उपयोग करावा. ब्रह्मगिरी उत्खननातील सर्व दोषींची चौकशी करून कारवाई करावी. ब्रह्मगिरी, सह्याद्री उत्खननात वापरल्या गेलेल्या जिलेटिन कांड्यांची चौकशी करण्यात 
यावी.’’ 

पालकमंत्र्यांकडून गंभीर दखल
पालकमंत्री भुजबळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन ब्रह्मगिरी, सह्याद्री पर्वत रांगेत होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. लवकरच या घटनेची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ब्रह्मगिरी बचाव समितीच्या सदस्यांना त्यांनी सांगितले. त्यामुळे विविध पर्यावरणवादी कार्यकर्ते व ब्रह्मगिरी कृती समितीने  समाधान व्यक्त केले.


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...