agriculture news in marathi, illegal Hunting in Gir Sanctuary | Agrowon

गुजरातच्या गीर अभयारण्यात चोरट्या शिकारी
महेश शहा ः सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

अहमदाबाद : वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे गुजरातेतील गीर अभयारण्यातील सिंह आणि चिंकारांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळी सुटीमुळे येणारे पर्यटक त्यांच्या वाहनांमधून सिंहांचा अक्षरशः पाठलाग करत आहेत, तर दुसरीकडे, जिवंत आमिष बांधून सिंह कशी शिकार करतात, हे दाखविण्याचा बेकायदा उद्योगही जोरात आहे.

अहमदाबाद : वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे गुजरातेतील गीर अभयारण्यातील सिंह आणि चिंकारांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाळी सुटीमुळे येणारे पर्यटक त्यांच्या वाहनांमधून सिंहांचा अक्षरशः पाठलाग करत आहेत, तर दुसरीकडे, जिवंत आमिष बांधून सिंह कशी शिकार करतात, हे दाखविण्याचा बेकायदा उद्योगही जोरात आहे.

गीर अभयारण्यात चोरट्या शिकाऱ्यांनी एका चिंकाराची हत्या केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. त्यात एकाला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील एका शिकारी टोळीने 2008 मध्ये सहा सिंहांची येथे हत्या केली होती. खंबाजवळच्या मितयाला विभागात चोरट्या शिकाऱ्यांचा मुक्काम असल्याची माहिती मिळाल्यामुळे वन विभागाचे शंभर कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. हे चोरटे एवढे निर्ढावले आहेत, की वन कर्मचाऱ्यांसमोरच एकाने चिंकाऱ्याला गोळी घातली. त्याला पकडण्यात आले. मात्र, त्याचे दोघे साथीदार फरारी आहेत. या घटनेचे वृत्त समजताच, उप वनसंरक्षक टी. कुरपप्पूस्वामी यांनी शंभर कर्मचारी घटनास्थळी रवाना केले. या संदर्भात कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याचीही शक्‍यता आहे.

जिवंत आमिष दाखवून सिंहांना आकर्षित करण्याचा उद्योगही सुरू आहे. धारीजवळ असा प्रकार घडल्याचे एका व्हिडिओवरून उघडकीस आले आहे. या प्रकारात जिवंत आमिष म्हणून गाय बांधण्यात आली होती. या संदर्भात सोहिल गराना याला अटक करण्यात आली आहे. वन खात्याने केलेल्या चौकशीनंतर अब्दुल रेहमान ऊर्फ हमील मरफानी, अब्बासी इक्‍बाल जरीवाला, वासिमखान इक्‍बाल बलुच, आशिष चौहान, असिफ शेख आणि असिफ महंमद थैयाम या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सिंहांसाठी दहा हजार
चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी वनसंरक्षक आणि मार्गदर्शकांच्या मदतीने सिंह न दिसलेल्या पर्यटकांबरोबर संपर्क साधत असत. काही फार्महाउसबरोबरही त्यांची हातमिळवणी होती. तेथे पर्यटकांना व्हिडिओ दाखविले जात असत. पाच ते दहा हजार रुपये दिल्यास, सिंह दाखविले जात असत. सिंह शिकार करतानाचे शूटिंग करावयाचे असल्यास, दहा ते 15 हजार रुपये घेतले जात होते, असे चौकशीत आढळले. 

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...