शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवैध वाळूउपसा जोरात

शिरूर अनंतपाळ(जि. लातूर) तालुक्यातील नदीच्या पात्रात वाळूच नसल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयास मध्यंतरी देण्यात आला होता. असे असले तरी लातूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ येथून वाळूची वाहतूक सुरूच आहे.
अवैध वाळूउपसा जोरात Illegal sand extraction loud
अवैध वाळूउपसा जोरात Illegal sand extraction loud

शिरूर अनंतपाळ, जि. लातूर ः तालुक्यातील नदीच्या पात्रात वाळूच नसल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयास मध्यंतरी देण्यात आला होता. असे असले तरी लातूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ येथून वाळूची वाहतूक सुरूच आहे. यातून मागील दोन-तीन वर्षांत कोट्यवधींची उलाढाल झाली असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडालाच. पण, पर्यावरणाचाही ऱ्हास झाला, त्यामुळे या वाळू उपशाला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातून मांजरा, घरणी, लेंढी नदीचे पात्र वाहतात. पात्रात दरवर्षी लाखो ब्रास वाळू वाहून येते. त्यामुळे महसूल प्रशासन जवळपास दहा ठिकाणचे लिलाव काढत असतात. यातून लाखो रुपयांचा महसूल विभागास जमा होतो. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांपासून लिलाव झालेला नाही. उलट तालुक्यात वाळू घाट नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. असे असतानाच मध्यंतरी वाळूच्या अवैध उपसा प्रकरणावरून साकोळ येथील ओढा सरळीकरण प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत गेले होते. यातही काही कारवाई नाही. मग वाळूसाठा कोठून आला? कोट्यवधींची उलाढाल कशी झाली? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

नदीकाठचे शेतकरी अल्पावधीत कोट्यधीश  तालुक्यातील नदीच्या पात्राशेजारील शेतकरी शेतीतील दहा फुटांच्या खोलीवर खोदून वाळूची विक्री धुमधडाक्यात करतात. असा प्रकार साकोळ, आजणी, शिरूर अनंतपाळ, बिबराळ बाकली या भागात दिसून येत आहे. मार्च अखेर अशा शेतकऱ्यांवर तलाठ्याकडून छोटीमोठी दंडात्मक कारवाई करीत लाखोंची वसुली करण्यात आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com