Agriculture news in marathi Illegal sand extraction loud | Page 2 ||| Agrowon

शिरूर अनंतपाळ तालुक्यात अवैध वाळूउपसा जोरात

टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 एप्रिल 2021

शिरूर अनंतपाळ (जि. लातूर)  तालुक्यातील नदीच्या पात्रात वाळूच नसल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयास मध्यंतरी देण्यात आला होता. असे असले तरी लातूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ येथून वाळूची वाहतूक सुरूच आहे.

शिरूर अनंतपाळ, जि. लातूर ः तालुक्यातील नदीच्या पात्रात वाळूच नसल्याचा अहवाल जिल्हा कार्यालयास मध्यंतरी देण्यात आला होता. असे असले तरी लातूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ येथून वाळूची वाहतूक सुरूच आहे. यातून मागील दोन-तीन वर्षांत कोट्यवधींची उलाढाल झाली असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडालाच. पण, पर्यावरणाचाही ऱ्हास झाला, त्यामुळे या वाळू उपशाला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातून मांजरा, घरणी, लेंढी नदीचे पात्र वाहतात. पात्रात दरवर्षी लाखो ब्रास वाळू वाहून येते. त्यामुळे महसूल प्रशासन जवळपास दहा ठिकाणचे लिलाव काढत असतात. यातून लाखो रुपयांचा महसूल विभागास जमा होतो. परंतु, गेल्या चार-पाच वर्षांपासून लिलाव झालेला नाही. उलट तालुक्यात वाळू घाट नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. असे असतानाच मध्यंतरी वाळूच्या अवैध उपसा प्रकरणावरून साकोळ येथील ओढा सरळीकरण प्रकरण थेट मंत्रालयापर्यंत गेले होते. यातही काही कारवाई नाही. मग वाळूसाठा कोठून आला? कोट्यवधींची उलाढाल कशी झाली? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

नदीकाठचे शेतकरी अल्पावधीत कोट्यधीश 
तालुक्यातील नदीच्या पात्राशेजारील शेतकरी शेतीतील दहा फुटांच्या खोलीवर खोदून वाळूची विक्री धुमधडाक्यात करतात. असा प्रकार साकोळ, आजणी, शिरूर अनंतपाळ, बिबराळ बाकली या भागात दिसून येत आहे. मार्च अखेर अशा शेतकऱ्यांवर तलाठ्याकडून छोटीमोठी दंडात्मक कारवाई करीत लाखोंची वसुली करण्यात आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...