राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
हमाल नसतानाही मनमानी वसुली; शेतकऱ्याचा संताप
शेतकऱ्याने भाड्याच्या वाहनातून आणलेला कांदा स्वतः खाली केला. मात्र असे असूनही व्यापाऱ्याने हमाली वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती नावाजलेली आहे. येथे कांद्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. मंगळवारी (ता.१९) एका व्यापाऱ्याच्या खळ्यावर हमाल नसल्याने शेतकऱ्याने भाड्याच्या वाहनातून आणलेला कांदा स्वतः खाली केला. मात्र असे असूनही व्यापाऱ्याने हमाली वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की दहिवड येथील कांदा उत्पादक संजय देवरे यांच्या कांद्याचा लिलाव झाला. नंतर त्यांनी खळ्यावर हमाल नसल्याने स्वत:चा १ क्विंटल ४० किलो कांदा भाड्याने आणलेल्या वाहनातून खाली केला. नंतर हिशोब पट्टीत मात्र हमालीपोटी १५ रुपये कापण्यात आले. त्यामुळे मनमानी हमाली झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासह आलेल्या वाहनांच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याचे देवरे यांचे म्हणणे आहे.
यावर शेतकऱ्याने उमराणे बाजार समितीच्या प्रतिनिधींशी फोनवर चर्चा केली असता बाजार समितीने दखल घेऊन व्यापारी खळ्यावर भेट देऊन पाहणी
करून व्यापाऱ्यांना समज दिली. मात्र काही व्यापारी मनमानी करून अनधिकृतपणे हमाली वसूल करत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे शेतकरी संजय देवरे यांनी सांगितले. यावर बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याला ज्या शेतकऱ्यांचे हमालीचे पैसे कापले आहेत. त्यांना परत करण्याच्या सूचना बैठकीत केल्या आहेत.
प्रतिक्रिया...
या प्रकाराबाबत लेखी तक्रार आलेली नाही. तरी माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याच्या खळ्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर दोन शेतकऱ्यांकडून वसूल केलेली हमाली परत करण्याच्या सूचना केल्याने त्यांना पैसे परत मिळाले. असे गैरप्रकार घडणार नाहीत. याची बाजार समिती प्रशासन नेहमी काळजी घेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये.
- नितीन जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे
- 1 of 1053
- ››