agriculture news in marathi illegal weight tax charged by trader in Umrane APMC deola Nashik | Page 2 ||| Agrowon

हमाल नसतानाही मनमानी वसुली; शेतकऱ्याचा संताप

ॲग्रोवन वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

शेतकऱ्याने भाड्याच्या वाहनातून आणलेला कांदा स्वतः खाली केला. मात्र असे असूनही व्यापाऱ्याने हमाली वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

नाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती नावाजलेली आहे. येथे कांद्याचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. मंगळवारी (ता.१९) एका व्यापाऱ्याच्या खळ्यावर हमाल नसल्याने शेतकऱ्याने भाड्याच्या वाहनातून आणलेला कांदा स्वतः खाली केला. मात्र असे असूनही व्यापाऱ्याने हमाली वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी, की दहिवड येथील कांदा उत्पादक संजय देवरे यांच्या कांद्याचा लिलाव झाला. नंतर त्यांनी खळ्यावर हमाल नसल्याने स्वत:चा १ क्विंटल ४० किलो कांदा भाड्याने आणलेल्या वाहनातून खाली केला. नंतर हिशोब पट्टीत मात्र हमालीपोटी १५ रुपये कापण्यात आले. त्यामुळे मनमानी हमाली झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यासह आलेल्या वाहनांच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याचे देवरे यांचे म्हणणे आहे. 

यावर शेतकऱ्याने उमराणे बाजार समितीच्या प्रतिनिधींशी फोनवर चर्चा केली असता बाजार समितीने दखल घेऊन व्यापारी खळ्यावर भेट देऊन पाहणी 
करून व्यापाऱ्यांना समज दिली. मात्र काही व्यापारी मनमानी करून अनधिकृतपणे हमाली वसूल करत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे शेतकरी संजय देवरे यांनी सांगितले. यावर बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याला ज्या शेतकऱ्यांचे हमालीचे पैसे कापले आहेत. त्यांना परत करण्याच्या सूचना बैठकीत केल्या आहेत.

प्रतिक्रिया...
या प्रकाराबाबत लेखी तक्रार आलेली नाही. तरी माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याच्या खळ्यावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर दोन शेतकऱ्यांकडून वसूल केलेली हमाली परत करण्याच्या सूचना केल्याने त्यांना पैसे परत मिळाले. असे गैरप्रकार घडणार नाहीत. याची बाजार समिती प्रशासन नेहमी काळजी घेते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गैरसमज करून घेऊ नये.
- नितीन जाधव, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, उमराणे


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात कोथिंबीर, मेथीच्या दरात...सोलापूर  ः सोलापूरबाजार समितीच्या आवारात...
औरंगाबादमध्ये कैरी खातेय भाव;...औरंगाबाद : आठवडाभरात जवळपास चार वेळा आवक झालेली...
नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा;...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
कोल्हापूरच्या उन्हाळी नाचणी प्रयोगाचे...कोल्हापूर/नगर : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा...
केंद्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर...नागपूर : शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील...
नगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर कांदा...नगर ः पाण्याची उपलब्धता असल्याने नगर जिल्ह्यात...
रुंद सरी वरंबा पद्धतीबाबत...जळगाव ः सुसरी (ता. भुसावळ) येथे नुकतेच जळगाव...
औरंगाबादेत बटाटा सरासरी ८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
हरभरा विक्रीसाठी ३७८३ शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी/हिंगोली : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (...
‘बॉयोमिक्‍स’मुळे विद्यापीठास वेगळी ओळख...परभणी ः वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे निर्मित...
केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे...गडचिरोली : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे...
पावसाळ्यातील भरपाईसाठी गावकरी करणार...भंडारा : तुमसर तालुक्‍यातील वैनगंगा, बावनथडी...
कोल्हापूरसाठी पाच फिरते पशुवैद्यकीय...कोल्हापूर : फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी पाच...
वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामामुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना...
स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी ...मुंबई : कॉँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय...
‘चामोली’ आपत्तीचा अन्वयार्थबर्फ वितळल्यानंतर उघडा पडलेला मातीचा भाग शेती,...
कृषी सल्ला : भुईमूग, हरभरा, मका, खोडवा...हरभरा पीक सर्वसाधारणपणे ११० ते १२० दिवसांमध्ये...
गहू कापणी, साठवणीचे नियोजनगेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होत असून...
पुण्यात काकडी, फ्लॉवरच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...