Agriculture news in marathi Immediate to the beneficiaries of the loan waiver Distribute crop loans: Mughlikar | Agrowon

कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करा ः मुगळीकर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 जून 2020

परभणी : कर्जमुक्ती योजनाअंतर्गत कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करावे. जून महिना संपण्यापूर्वी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे’’, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. 

परभणी : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाअंतर्गत कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करावे. जून महिना संपण्यापूर्वी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे’’, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले. 

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार जिल्हा बॅंक वगळता अन्य बॅंकांचे पीक कर्जवाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याची बाब निदर्शनास आली आहे. पीक कर्जवाटपास गती देण्यासाठी बॅंकांना सूचना केल्या आहेत. त्यात १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीककर्जासाठी इतर बॅंकांचे बेबाकी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी शेतकऱ्याचे स्वंयघोषणापत्र घ्यावे. नवीन शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करावे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधील एनपीए असेलेल्या खात्यांना शासनाने हेअर कट अकारला आहे. उर्वरित रक्कम बँकांनी सोसावयाची आहे. 

कर्जखाते बेबाक करावयाचे आहे. उर्वरित रक्कम संबधित शेतकऱ्यांना भरणा करण्यास सांगू नये. पीककर्ज मागणीसाठी www.parbhani.gov.in या वेबसाईट वरील अर्ज नमुना डाऊनलोड करुन आवश्यक त्या कागदपत्रासह ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी संबंधित गावातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह कर्ज मागणी अर्ज तत्काळ स्विकारावे. सर्व बॅँकांनी सुलभ पीक कर्जवाटप अभियानाअंतर्गंत शाखेतील ग्राहकांना एसएमएस पाठवून संपूर्ण कागदपत्रासह कर्ज मागणी अर्ज ग्रांमपंचायत कार्यालयात जमा करण्याच्या सूचना द्याव्या. 

गावनिहाय, शाखानिहाय अर्ज घेताना केसीसी कार्ड न मिळालेल्या शेतकऱ्याकंडून त्यासाठीचे अर्ज भरुन घेऊन तत्काळ केसीसी कार्ड वाटप करावे. सर्व पीएम किसान लाभार्थ्यांना केसीसीचे कार्ड वाटप करावे. पात्र शेतकऱ्यांना पीककर्जासोबतच पशु-पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन, मत्स्यपालन आदीसाठी कर्जवाटप करावे, अशा सूचना मुगळीकर आणि जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी केल्या. 
 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...