Agriculture news in marathi Immediate detention of `janhit` Money in farmers' bank accounts | Agrowon

जनहितचे धरणे अन् तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे व बागांचे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळाली नाही. सातत्याने पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.३) तहसीलसामोर धरणे आंदोलन करताच, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. 

सोलापूर  ः मोहोळ तालुक्यातील ऑक्टोबर - नोव्हेंबर २०१९ मध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे व बागांचे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळाली नाही. सातत्याने पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे जनहित शेतकरी संघटनेने शुक्रवारी (ता.३) तहसीलसामोर धरणे आंदोलन करताच, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले. 

संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मोहोळ तालुक्यातील कोन्हेरीतील ५९ शेतकरी, पाटकूलचे १८९ शेतकरी, तसेच तालुक्यातील इतर काही गावांच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्याबाबत देशमुख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. 

मोहोळ तहसिल कार्यालयासमोर ११ ते ५ या पाळत जमावबंदीचा व सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सायंकाळी शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित बँकेने पैसे जमा केले.

या आंदोलनात विकास जाधव, चंद्रकांत निकम, नानासाहेब मोरे, सरपंच महेश धुमाळ, सरपंच शिवाजी पासले, जिलानी शेख, नितीन जरग, दत्तात्रय चौधरी, दिपक जरग, अशोक शेळके, अरुण सातपुते, परमेंश्वर माने आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...