agriculture news in marathi Immediate implementation of water scarcity measures | Page 2 ||| Agrowon

पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना तातडीने राबवा : प्रतिभाताई भोजने

ॲग्रोवन वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत प्रशासनाला दिल्या.

अकोलाः दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या वर्षी पाणीटंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत प्रशासनाला दिल्या. गुरुवारी (ता.१५) भोजने यांच्या अध्यक्षतेत सभा झाली.

पाण्यावरून जिल्ह्यातील काही भागात स्फोटक स्थिती तयार झालेली आहे .पाणीटंचाई जाणवत असली तरी त्यामागचे नैसर्गिक कमी आणि असहकार्य तसेच नियोजनाचा अभाव अधिक असून तेल्हारा तालुक्यात बोअरवेल द्या किंवा टँकर लावून जनतेला दिलासा द्या, असे मत यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय अढाऊ यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झालेल्या सभेचे कामकाज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी पाहिले.

सभेला उपाध्यक्षा तथा अर्थ,आरोग्य तथा शिक्षण व बांधकाम समिती सभापती सावित्रीबाई राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, पशुसंवर्धन व कृषी सभापती पंजाबराव वडाळ, सदस्य संजय अढाऊ, सुष्मिताताई सरकटे, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके यांच्यासह पाणी व स्वच्छता विभागाचे संबंधित अधिकारी ऑनलाइन सहभागी होते.

जलवाहिनीच्या दुरुस्तीत अनियमितता; चौकशीचे आदेश
जिल्ह्यात ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत टाकलेल्या जलवाहिनीच्या कामात अनियमितता झालेली आहे. याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंर्वर्धन सभापती पंजाबराव वडाळ यांनी समितीच्या मागील सभेत केली होती. त्याबाबत काय कार्यवाही झाली, अशी विचारणा करीत या प्रकरणाची चौकशी २२ एप्रिल रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्षा भोजने यांनी दिले.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...
धान चुकाऱ्याअभावी शेतकऱ्यांची आर्थिक...गोंदिया : गेल्यावर्षी आधारभूत दराने धान विक्री...
सांगलीत खरिपासाठी हवे ३३ हजार ६९०...सांगली  : यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कृषी...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
तुलनेत यंदा दुपटीने गाळपकोल्हापूर : गेल्या हंगामापेक्षा यंदाच्या हंगामात...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, कांदा, फळ...जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीत...
अस्वलाकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी...भंडारा : जंगलालगत असलेल्या शेतीत वन्यप्राण्यांचा...
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल, ‘...मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे...पुणे ः बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड...
नाशिक : माथाडी युनियनकडून ‘काम बंद’नाशिक : राज्य शासनाच्या विविध माथाडी मंडळातील...
पुणे ‘जि.प.’तर्फे कर्मचाऱ्यांना मिळणार...पुणे ः ‘‘जिल्हा परिषदेच्या बक्षिस योजनेतून आता...
‘खरिपात सोयाबीनचे घरचेच बियाणे वापरा’सातारा : येत्या खरीप हंगामात  सोयाबीनचे...