agriculture news in Marathi immediate licence for transport of agricultural produce Maharashtra | Agrowon

शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार तत्काळ परवाना 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दूध आदी अत्यावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी शेतकरी गट आणि शेतकऱ्यांना परवाना देण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सुरुवात केली आहे.

पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दूध आदी अत्यावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी शेतकरी गट आणि शेतकऱ्यांना परवाना देण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) सुरुवात केली आहे. ऑनलाइन व ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली असून शेतकऱ्यांनी संबंधित ‘आरटीओ’ कार्यालयाशी संपर्क साधून परवाना घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

संचारबंदीमुळे वाहनधारकांना ‘आरटीओ’ कार्यालयात येणे शक्य होत नाही. त्यामुळे परिवहन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.२५) झालेल्या बैठकीत अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार या परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कळविले आहे. 

‘आरटीओ’ कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे, म्हणून प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ‘आरटीओ’ यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ई-मेलवर अर्ज स्वीकारावेत. असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जात नमूद वाहनास तत्काळ प्रमाणपत्र जारी करावे व त्याची नोंद स्वतंत्र नोंद वहीत ठेवावी. जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करणाऱ्या वाहनधारकाच्या ई-मेलवर स्कॅन करून पाठवावे. प्रमाणपत्रावर ‘सेकंड कॉपी सेंट फ्रॉम ऑफिस ई-मेल’ अशी टीप टाकावी. 

वाहनधारकांनी परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी किंवा व्हाट्सअॅपद्वारे अर्ज करावा. या संदर्भात शासन 
अधिसूचना २५ मार्च २०२० रोजी सुधारीत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. सूचनांतील मुद्दा क्रमांक नऊमध्ये अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सदर बंदीतून वगळण्यात आले आहे. तसेच मुद्दा क्रमांक २२ मध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांनी स्वतःच असे स्टिकर आपल्या वाहनांवर लावण्याच्या सूचना आहेत.

तथापि जे वाहनधारक परिवहन विभागाच्या प्रमाणपत्रांची मागणी करतील त्यांना rto.०१-mh@gov.in किंवा संबंधित परिवहन कार्यालयाने दिलेल्या ई-मेलवर अर्ज करून परिवहन विभागाचे प्रमाणपत्र जारी करावे, अशा सूचना उप परिवहन आयुक्तालयाच्या प्रशासन विभागाने दिल्या आहेत. 

पुणे जिल्ह्यासाठी संपर्क 
पुणे जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी गट, वाहतूक संघटनांनी वाहतुकीसाठी पुणे, बारामती, पिंपरी चिंचवड या विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी पुणे विभागातील नागरिकांनी mh१२@mahatranscom.in, बारामती विभागातील नागरिकांनी mh१२@mahatranscom.in, तर पिंपरी चिंचवड विभागातील नागरिकांनी mh१४@mahatranscom.in या ईमेलवर अर्ज करावेत. अर्ज करताना गाडीचे फिटनेस प्रमाणपत्र, इन्शुरन्स पावती, टॅक्स पावती व विमा पावती जोडणे आवश्यक आहे. बारामती विभागात ऑनलाइन १८ तर ऑफलाईन ८ असे एकूण २६ अर्ज दाखल झाले होते. या सर्वांना प्रमाणपत्र तत्काळ दिले असून तीन अर्ज रद्द झाल्याची माहिती बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे विनायक साखरे यांनी दिली. 
 


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...