agriculture news in marathi Immediate panchnama of damaged crops: Patil | Agrowon

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा : पाटील

टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आळसंद, जि. सांगली : ‘‘परतीच्या पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत’’, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले. 

आळसंद, जि. सांगली : ‘‘परतीच्या पावसाने खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत’’, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले. 

कार्वे ( ता.खानापूर ) येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संवाद साधला. माजी आमदार सदाशिवराव पाटील, तहसीलदार ऋषिकेत शेळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी खचून न जाता ठामपणे उभे राहावे. शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे. तालुका प्रशासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत. पंचनाम्यापासून कुणीही वंचित राहू नये. याची दक्षता घ्यावी.’’ 

शेळके म्हणाले, ‘‘पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे कृषि विभाग व महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. सुमारे ४०० हेक्टर क्षेत्रावर नजर अदांज नुकसान झाले आहे.’’  

पाटील यांनी सोपान जाधव, गणेश पाटील, विनोद पाटील, विजय जाधव यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. 

सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किसन जानकर, मंडल कृषी अधिकारी कदम, कृषि पर्यवेक्षक एस.ए. कुंभार,  मंडल अधिकारी ए. एस. पाटोळे, तलाठी धनश्री कदम, अक्षय जाधव, बाबासाहेब जाधव, विक्रम जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...