Agriculture news in marathi Immediate Punchnama of damaged crops : Bharne | Agrowon

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा : भरणे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी (ता.२४) दिल्या.

सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करावेत, अशा सूचना पालकत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी (ता.२४) दिल्या.

जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गार्डी, कासेगांव, सांगोला तालुक्यातील महूद येथील कासाळ-गंगा ओढा तसेच माळशिरस तालुक्यातील मळोली येथील अतिवृष्टिने पूर आला. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांची व पडझड झालेल्या घरांची पहाणी पालकमंत्री भरणे यांनी केली. यावेळी, आमदार भारत भालके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, उदयसिंह भोसले, शमा पवार, तहसिलदार वैशाली वाघमारे, योगेश खरमाटे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, संतोष राऊत, स्मिता पाटील, तालुका कृषि अधिकारी गजानन ननवरे, दिपाली जाधव, राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, महावितरणचे कासार उपस्थित होते.

भरणे म्हणाले, ‘‘अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. 

अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासन स्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करु नये. वेळेत ही मदत देण्याबाबत प्रयत्न राहतील. यावेळी आमदार भालके यांनी नुकसानगस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाच्या वतीने तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.

५४ गावातील सात हजार हेक्टर पिकांचे नुकसान

पंढरपूर, माळशिरस व सांगोला तालुक्यातील ५४ गावांतील मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे ६५०० ते ७००० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त ५१७ कुटुबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पुराच्या पाण्यामुळे काही गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा पुर्वरत करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे पालकमंत्री भरणे म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायमकोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने...
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...