शेतीपंपाची वीज तातडीने जोडा; अन्यथा आंदोलन 

शेतीपंपाची वीज तातडीने जोडा; अन्यथा आंदोलन 
शेतीपंपाची वीज तातडीने जोडा; अन्यथा आंदोलन 

कोल्हापूर ः महापुरामुळे बाधित झालेल्या शेतीपंपाची वीजजोडणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येत्या १५ आॅक्‍टोबरपूर्वी जोडून द्यावी; अन्यथा भर दिवाळीसणात महावितरण मुख्यालयाच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी निवेदनाद्वारे दिला.  महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एच. कावळे याना निवेदन देण्यात आले. 

या वेळी इरिगेशन फेडरेशनच्या शिष्ठमंडळाने अभियंता श्री. कावळे यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट ओढावले. या काळात पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतीपंपाच्या वीजपुरवठा साधनात; तसेच वीज मीटरमध्ये पुराचे पाणी गेले. गाळ अडकला त्यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. महापूर ओसरला त्याला दोन महिने होत आले तरीही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. 

त्यामुळे शेतीला पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत महापुरात हानी पोचलेले वीजपुरवठा पूरक साहित्य, वीज मीटर, इतर साहित्यांची महावितरणने जोडणी करून शेतीपंपाचा वीजपुरवठा येत्या १५ आॅक्‍टोबरपर्यंत सूरू करावा, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनची आहे. 

महापुरामुळे जवळपास १४६० ट्रन्सफाॅर्मर खराब झाले. त्यासाठी लागणाऱ्या ऑइलचा तुटवडा होता, असे सांगण्यात येत होते. मात्र, असे दहा हजार लिटर ऑइल नुकतेच महावितरणला उपलब्ध झाले असून त्याआधारे ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जातील, असेही अभियंत्यांनी सांगितले. याशिवाय मीटर रीडिंगमध्ये वारंवार घोळ होतात, वीजबिले चुकीची किंवा वाढीव येतात, ही बाब विचारात घेऊन संबंधित गावातील बेरोजगार तरुणांना रीडिंग घेण्याचे बिले देण्याचे ठेका द्यावा, अशा मागण्याही इरिगेशन फेडरेशनच्या शिष्ठमंडळाने केल्या.

तसेच शेतीपंपाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा; अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला, अशी माहिती श्री. पाटील किणीकर यांनी दिली. या शिष्ठमंडळात कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, गुणाजी जाधव आदी उपस्थित होते.

वीजबिलांत करणार दुरुस्ती याशिवाय अनेक वीज मीटर बंद आहेत, त्यातील वीजवापराचा अंदाज घेऊन त्या अंदाजावर आधारित वीजबिले पाठविली आहेत. त्या वीजबिलांची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी शिष्ठमंडळाने केली. ही मागणी महावितरणने मान्य केली असून अशी बिले संबंधित विभागीय कार्यालयात दुरुस्त देण्यात येतील, असे अभियंत्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com