Agriculture news in Marathi, Immediately add farm electricity; Otherwise the movement | Page 2 ||| Agrowon

शेतीपंपाची वीज तातडीने जोडा; अन्यथा आंदोलन 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर ः महापुरामुळे बाधित झालेल्या शेतीपंपाची वीजजोडणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येत्या १५ आॅक्‍टोबरपूर्वी जोडून द्यावी; अन्यथा भर दिवाळीसणात महावितरण मुख्यालयाच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी निवेदनाद्वारे दिला.  महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एच. कावळे याना निवेदन देण्यात आले. 

कोल्हापूर ः महापुरामुळे बाधित झालेल्या शेतीपंपाची वीजजोडणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येत्या १५ आॅक्‍टोबरपूर्वी जोडून द्यावी; अन्यथा भर दिवाळीसणात महावितरण मुख्यालयाच्या दारात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी निवेदनाद्वारे दिला.  महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एच. कावळे याना निवेदन देण्यात आले. 

या वेळी इरिगेशन फेडरेशनच्या शिष्ठमंडळाने अभियंता श्री. कावळे यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुराचे संकट ओढावले. या काळात पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतीपंपाच्या वीजपुरवठा साधनात; तसेच वीज मीटरमध्ये पुराचे पाणी गेले. गाळ अडकला त्यामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. महापूर ओसरला त्याला दोन महिने होत आले तरीही वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. 

त्यामुळे शेतीला पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत महापुरात हानी पोचलेले वीजपुरवठा पूरक साहित्य, वीज मीटर, इतर साहित्यांची महावितरणने जोडणी करून शेतीपंपाचा वीजपुरवठा येत्या १५ आॅक्‍टोबरपर्यंत सूरू करावा, अशी मागणी इरिगेशन फेडरेशनची आहे. 

महापुरामुळे जवळपास १४६० ट्रन्सफाॅर्मर खराब झाले. त्यासाठी लागणाऱ्या ऑइलचा तुटवडा होता, असे सांगण्यात येत होते. मात्र, असे दहा हजार लिटर ऑइल नुकतेच महावितरणला उपलब्ध झाले असून त्याआधारे ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जातील, असेही अभियंत्यांनी सांगितले. याशिवाय मीटर रीडिंगमध्ये वारंवार घोळ होतात, वीजबिले चुकीची किंवा वाढीव येतात, ही बाब विचारात घेऊन संबंधित गावातील बेरोजगार तरुणांना रीडिंग घेण्याचे बिले देण्याचे ठेका द्यावा, अशा मागण्याही इरिगेशन फेडरेशनच्या शिष्ठमंडळाने केल्या.

तसेच शेतीपंपाचा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा; अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला, अशी माहिती श्री. पाटील किणीकर यांनी दिली. या शिष्ठमंडळात कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, गुणाजी जाधव आदी उपस्थित होते.

वीजबिलांत करणार दुरुस्ती
याशिवाय अनेक वीज मीटर बंद आहेत, त्यातील वीजवापराचा अंदाज घेऊन त्या अंदाजावर आधारित वीजबिले पाठविली आहेत. त्या वीजबिलांची दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी शिष्ठमंडळाने केली. ही मागणी महावितरणने मान्य केली असून अशी बिले संबंधित विभागीय कार्यालयात दुरुस्त देण्यात येतील, असे अभियंत्यांनी सांगितले.


इतर बातम्या
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...