तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा ः डवले

तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा ः डवले
तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा ः डवले

बुलडाणा : जिल्ह्यात झालेल्या मुसळधार अवकाळी व परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विमा काढलेल्या पिकांचे व विमा न काढलेल्या पिकांसाठी करण्यात येत असलेले पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करा. नुकसानग्रस्त कुणीही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे कृषी, मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी (ता. नऊ) पीक नुकसान पंचनाम्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक श्री. लहाने आदी उपस्थित होते.

विमा कंपनीने कृषी, महसूल विभागाशी समन्वयाने काम करीत विमा दावा तातडीने पूर्ण करावे. झालेल्या नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन नुकसान झालेल्या विमा संरक्षित प्रत्येक शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळेल याची दक्षता घ्यावी. विमा कंपनीने  शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास त्यांचे निराकारण तातडीने करावे, असेही श्री. डवले यांनी सांगितले. या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याची माहिती श्री. नाईक यांनी सांगितले. श्री. डवले यांनी, वाढत्या रब्बी क्षेत्राला पुरेल एवढे बियाणे व खताचे नियोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महावितरणने रब्बी हंगामात विजेचा व्यवस्थित पुरवठा होण्यासाठी नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती तातडीने करून घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com