नाशिक जिल्ह्यात नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा

नाशिक : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पाहिल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या अतिपावसामुळे मुग, उडीद, कपाशी, मका, बाजरी यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे.
 Immediately conduct panchnama of damaged crops in Nashik district
Immediately conduct panchnama of damaged crops in Nashik district

नाशिक  : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पाहिल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या अतिपावसामुळे मुग, उडीद, कपाशी, मका, बाजरी यासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कळवण, मालेगाव, सटाणा, नांदगाव, येवला या तालुक्यात पिकांचे नुकसान अधिक आहे. त्यामुळे शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करावे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी व विविध शेतकरी संघटनांनी प्रशासनाकडे केली.

अनेक तालुक्यातील पिके आता शेतमाल तयार होण्याच्या, तर काही काढणीच्या अवस्थेत आली आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने व वाफसा होत नसल्याने पिके नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे तहसिलदार उदय कुलकर्णी यांना शेतकरी संघर्ष संघटना, तसेच प्रहार शेतकरी संघटनेतर्फे संयुक्त निवेदन देण्यात आले. त्याद्वारे तातडीने पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी संघर्ष संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाना बच्छाव, संदिप सुर्यवंशी, राम निकम, राहुल बिऱ्हाडे, प्रविण जाधव, गोरख मगर उपस्थित होते.

येवला तालुक्याच्या पूर्व भागात अंदरसुल परिसरात १ महिन्यापासून पाऊस सुरू आहे. जमिनी उपळल्या आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने द्या, अशी मागणी अंदरसुल ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता सोनवणे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. 

निफाड तालुक्यात डोंगरगाव व नांदगाव भागातील पावसाचे पाणी येऊन शेतांमध्ये साचते. त्यामुळे रुई, कोळगाव, धानोरे, कानळद या गावातील ६०० ते ७०० हेक्टर क्षेत्रावरील प्रामुख्याने सोयाबीन व मका पिकांचे नुकसान झाले. याबाबत जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांनी तहसिलदार दीपक पाटील व कृषी अधिकारी बी. जी. पाटील यांची भेट घेतली. १०० टक्के नुकसान गृहित धरून भरपाई देण्याची मागणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com