Agriculture news in marathi; Immediately declare drought in Wada and help farmers immediately | Agrowon

वऱ्हाडात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

अकोला  ः या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने संपूर्ण खरीप हंगाम अडचणीत आला. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका अशा विविध पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विविध संस्था, संघटनांकडून शासनाकडे करण्यात आली आहे.      

अकोला  ः या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने संपूर्ण खरीप हंगाम अडचणीत आला. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका अशा विविध पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शासनाने तातडीने या भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विविध संस्था, संघटनांकडून शासनाकडे करण्यात आली आहे.      

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी धरणे
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. मॉन्सूनोत्तर पावसाने शेतातली मूग, उडीद, ज्वारी, सोयाबीन व कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतात पाणी साचलेले असल्यामुळे रब्बीचे पीकसुद्धा लागवड करता आलेले नाही. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देऊन रब्बी हंगामाकरिता कर्जवाटप करावे, शेतकऱ्यांना खरिपात झालेल्या पीक नुकसानीकरिता एकरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांकडून विमा कंपनीने कोणत्याही प्रकारचे कागदपत्र न घेता नुकसानभरपाई द्यावी, कृषी पंपावरील वीजबिल माफ करून रब्बी व उन्हाळी हंगामांत मोफत वीज देण्यात यावी, वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे नुकसानाचा पंचनामा करून पिकांची नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतकरी आंदोलनात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले. आंदोलनात शेतकरी जागर मंचाचे कृष्णा अंधारे, जगदीश मुरुमकार, मनोज तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी, विजय देशमुख, राम वर्गे, संजय भाकरे, निलेश देशमुख व इतर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या ः बाबूराव शिंदे 
मागील पंधरा दिवसांपासून वाशीम जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने थैमान घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकासह कापूस पिकावर मोठ्या संकट उभे राहले. आधीच अडचणीत असणारा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेस युवक आघाडीचे वाशीम जिल्हाध्यक्ष बाबूराव शिंदे यांनी केली आहे. त्यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की या वर्षी  खरिपाची पिके सुरवातीला बहरली होती. परंतु, निसर्गाच्या लहरीपणामुळे या वेळेस पुन्हा शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी पडले आहे, वाशीम जिल्ह्यातील मालेगाव रिसोड तालुक्यात मॉन्सूनोत्तर पावसाने शेतातील सोयाबीनचे पीक नष्ट झाले आहे. सोयाबीनची कापणी करून गंजी मारलेल्या सोयाबीनला कोंब आले आहेत.

हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; स्वाभिमानी संघटना
नांदुरा (जि. बुलडाणा) तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत कोरडा दुष्काळ पडला. या वर्षी ओला दुष्काळ आल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग, सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका, बाजरी अशी सर्वच पिके सडून गेली आहेत. त्यामळे शेतीवर केलेला खर्च व्यर्थ गेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, पीककर्ज नाही म्हणून शेतकऱ्यांनी उधार, उसनवार करून शेतीची पेरणी केली. पावसामुळे शेतातील पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, मुलामुलींचे शिक्षण, आजारावचे उपचार, लग्न कसे करायचे, असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे नांदुरा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, सक्तीची कर्जवसुली थांबवा, बँक खात्यांवर येणारे अनुदान, पीकविमा कर्ज खात्यांमध्ये वळती करू नये, अशा मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष समाधान भातूरकर, सुरेश राखोंडे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय अमलकर, जगन्नाथ इटणारे, महेंद्र दांडगे, पुरुषोत्तम भातुरकर, संतोष मुंढे, लहुजी ठाकरे, बाळू आत्तरकर, श्यामराव देवकर, कैलास भातुरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात गव्हाचा १ लाख ६८ हजार...पुणे  ः पुणे विभागात गव्हाच्या पेरण्या...
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या माध्यमातून...नागपूर  ः खासदार औद्योगिक महोत्सवाच्या...
अकोला कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे...अकोला  : ‘कृषी’चे पदव्युत्तर शिक्षण हे...
तीन जिल्ह्यांत तूर विक्रीसाठी २९...नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी,...
आळसंद येथील पशुवैद्यकीय दवाखाना उद्‌...आळसंद, जि. सांगली : आळसंद (ता. खानापूर) येथे...
तीन जिल्ह्यांत सतरा लाख ४१ हजार क्विंटल...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून... मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात...
कातळावरील गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कांदळगाव (ता. मालवण)...
सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांना सुविधा...नाशिक : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देऊन त्यांचा...
महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात रताळी,...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
बदलत्या हवामानात कृषी जैवविविधतेचे...संयुक्त राष्ट्रसंघाच्या कृषी जैवविविधता आणि अन्न...
हरितगृह वायू कोणते?मागील लेखामध्ये हरितगृह परिणाम म्हणजे काय, ते आपण...
जागतिक तापमानवाढीवर हरितगृह वायूंचा...सध्या सर्वत्र तापमानवाढीची चर्चा असली, तरी...
गिरणा परिसरात कांदा लागवडीकडे कलमेहुणबारे, जि. जळगाव  ः चाळीसगाव तालुक्‍यात...
घराघरांत पोचणार नळ कनेक्‍शन, बसणार मीटर...जळगाव  : जिल्ह्यात ग्रामीण भागातील जनतेला...
जळगाव जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतून...जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी शासनाने महात्मा...
शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक कर्जमुक्तीचा...अकोला ः शेतकरी कर्जदार नसून तो भूमीचा राजा आहे....
केंद्राच्या पथकाकडून लासलगावला कांदा...नाशिक  : कांद्याचे घसरते बाजार भाव पाहता...
`रेशीम प्रकल्पाच्या मंजुरीसाठी...औरंगाबाद : राज्यातील रेशीम उद्योगाच्या एकूणच...
अमरावती येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना...अमरावती ः जिल्हा परिषदेत आठवड्यातील दोन दिवस...