'एकरुख'ची कामे त्वरित संपवा : आमदार कल्याणशेट्टी

एकरूख उपसा सिंचन योजनेची जमीन अधिग्रहण अडचणीसाठी ग्रामस्थ, शेतकऱ्यांबरोबर संवाद साधणार आहे. शासन स्तरावरील प्रश्‍नांसाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्याचे मंत्र्यांशी चर्चा करेन. योजना पूर्ण झाल्यास अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील ७२ गावांच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघेल. १७ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येईल. - सचिन कल्याणशेट्टी, आमदार
 Immediately finish the work of 'Ekrukh': Kalyanshetty,  MLA
Immediately finish the work of 'Ekrukh': Kalyanshetty, MLA

अक्कलकोट, जि. सोलापूर : ‘‘एकरूख मध्यम प्रकल्प व एकरूख उपसा सिंचन योजनेची कामे लवकर पूर्ण होण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांनी एकमेकांशी समन्वय साधून तत्काळ कामे मार्गी लावा,’’ अशा सूचना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिल्या.

सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात संबंधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांची एकत्रित आढावा बैठक आमदार कल्याणशेट्टी यांनी घेतली. ही  योजना मागील २० वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रत्येक वेळी तालुक्‍यात होणाऱ्या विविध निवडणुका या पाण्याच्या विषयावरच होत आल्या आहेत. पण प्रश्‍न सुटला नाही. तो केवळ चर्चेचा विषय राहिला आहे, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले. 

एकरूख मध्यम प्रकल्प व एकरूख उपसा सिंचन अशा दोन टप्प्यांतील कामाची वेगवेगळ्या टप्प्यांतील तांत्रिक बाब आणि योजनेला मिळालेल्या मंजुरीपासून ते आजपर्यंत झालेला वित्तीय खर्च, प्रकल्प प्रलंबित राहण्याच्या मागची कारणे, पुढे त्यासाठी लागणारा निधी आदींबरोबरच किती टक्के काम पूर्ण झाले आहे आणि ते केल्यानंतर योजना कशी पूर्ण होणार, याची माहिती कल्याणशेट्टी यांनी घेतली. 

कामांच्या स्थितीची पाहणी

कामासाठी लागणारी शासकीय स्तरावरील मदतीची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, कारंबा, हगलूर, बोरामणी व धोत्री येथील कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या सद्यःस्थितीची अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. कार्यकारी अभियंता आर. जी. वाडकर, एफ. आर. मुजावर, श्रीनिवास लिंबोळे, डी. एम. पवार, शिरीष जाधव, संभाजी गरड, अशोक येणेगुरे, अतुल कोकाटे, धनंजय गाढवे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com