Agriculture News in Marathi Immersion of farmers' bones in Lakhimpur Kheri incident | Agrowon

नगर जिल्ह्यात रब्बीची  सहा टक्के पेरणी 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

नगर जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस चांगला झाला आहे. जमिनी चिभडल्याने ज्वारी पेरणीला विलंब होत आहे. पेरणी कालावधी निघून गेला, तर त्याजागी गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

 नगर ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत रब्बीची ६ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस चांगला झाला आहे. जमिनी चिभडल्याने ज्वारी पेरणीला विलंब होत आहे. पेरणी कालावधी निघून गेला, तर त्याजागी गहू, हरभऱ्याचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. कांद्याचे यंदा मोठे नुकसान झाले. त्यामुळे कांद्याची लागवड गेल्या वर्षीएवढी होऊ शकते किंवा त्यात घटही होऊ शकते, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

जिल्ह्यात रब्बीत ७ लाख २६ हजार २९२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात सर्वाधिक ज्वारीचे ४ लाख ७७ हजार ०१८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. ज्वारीची साधारण सप्टेंबरमध्येच पेरणीला सुरुवात होते. गेल्या वर्षी एन पेरणीच्या काळात परतीच्या पाऊस लागून राहिल्याने वापसा व्हायला महिनाभर उशीर झाला. त्यामुळे गेल्या वर्षी ज्वारीचे सुमारे दीड लाख हेक्टरवर क्षेत्र घटले. यंदाही पावसामुळे अशीच स्थिती आहे. आतापर्यंत ज्वारीची ४१ हजार हेक्टरवर पेरणी झाली. अजून पेरण्या सुरू असल्या तरी गेल्या वर्षीचे घटते क्षेत्र पाहून यंदा तीन लाख हेक्टरवर पेरणी गृहीत धरून नियोजन केले आहे. 

आतापर्यंत मक्याची ८१९ हेक्टर, हरभऱ्याची ७३१ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारीचे क्षेत्र घटले, तरी त्या जागी हरभरा, गव्हाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी गव्हाची ८५ हजार हेक्टरवर, तर हरभऱ्याची पेरणी एक लाख हेक्टरच्या पुढे झाली होती. यंदा हरभऱ्यासाठी १ लाख ५३ हजार ६२७, गव्हासाठी ५६ हजार ८६३ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. 

कांदा क्षेत्रवाढीची शक्यता नाही 
नगर जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा पीक घेतले जाते. उन्हाळी कांदा अधिक प्रमाणात घेतला जातो. कांद्याची खरिपात २५ हजार, रब्बीत साधारण साठ हजार तर उन्हाळी कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड होते. दोन वर्षांपूर्वी वर्षभरात दीड लाख हेक्टरच्या पुढे कांदा लागवड झाली होती. यंदा आतापर्यंत रब्बीत ३६ हजार हेक्टरवर लागवड झाली. मात्र दर आणि झालेले नुकसान पाहता कांद्याचे क्षेत्र फारसे वाढेल, अशी शक्यता नाही. 

सरासरी क्षेत्र (हेक्टर) 
ज्वारी...४७७०१८ 
गहू...५६८६३ 
मका...३६०५४ 
हरभरा...१५३६२७ 
करडई...६५१ 
तीळ...११७ 
जवस...१५० 
सूर्यफूल...१५७ 


इतर बातम्या
जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेकजळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने...
राज्यात पावसाला पोषक हवामान पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने...
पावसाला पोषक हवामानामुळे किमान तापमानात...पुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्याच्या किमान...
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भात खरेदीच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरीः ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारामध्ये...
बीज प्रक्रियेसाठी यंत्राचा वापर वाढलावाशीम : शेतकऱ्यांमध्ये बीजप्रक्रियेचे महत्त्व...
सांगलीत कृषिपंपांची वीजजोड तोडणी सुरुसांगली ः कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीसाठी...
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे तीन...पुणे ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या...
फेरफार नोंदीत पुणे जिल्हा आघाडीवरपुणे ः शेत जमिनी खरेदी विक्री दरम्यान अंत्यत...
सोलापूर जिल्ह्यात खरिपातील पीक ...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप...