Agriculture News in Marathi Immersion of farmers' bones in Lakhimpur Kheri incident | Page 2 ||| Agrowon

लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याची घटना घडली होती. या घटनेतील मृत शेतकऱ्यांच्या अस्थींचे विसर्जन पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्यात आले.

वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याची घटना घडली होती. या घटनेतील मृत शेतकऱ्यांच्या अस्थींचे विसर्जन पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्यात आले. वर्धा येथील शेतकरी आरक्षण संकल्पाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांची या वेळी उपस्थिती होती. अग्रवाल यांनी लखीमपूर येथील घटनेचा निषेध करीत कृषिप्रधान देशाला काळिमा फासणारी ही घटना असल्याचा आरोप केला. 

लखीमपूर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने आपल्या वाहनाखाली चिरडले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या मृतकाच्या अस्थींचे विसर्जन देशभरातील पवित्र नद्यांमध्ये केले जात आहे. पंढरपूर येथे शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांच्यासह विनायक पाटील व अन्य शेतकरी नेते यांच्या उपस्थितीत अस्थी विसर्जन करण्यात आले. 

या वेळी शैलेश अग्रवाल यांनी भारताच्या गौरवशाली राजकीय, सामाजिक इतिहासाला लखीमपूरची घटना काळिमा फासणारी असल्याचा आरोप केला. अग्रवाल म्हणाले, ‘‘अशा प्रकारे आंदोलन चिरडले जात असतील तर देशात लोकशाही संपुष्टात आली असेच दुर्देवाने म्हणावे लागेल. दिल्लीच्या सीमेवर सुरू असेलल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल केंद्राकडून घेण्यात आली नाही. हा प्रकार देखील कृषी प्रधान देशाकरीता गौरवपूर्ण नाही. कोणत्याही जाती, धर्म किंवा पक्षात असला तरी शेतकऱ्याने त्यांच्या प्रश्‍नाप्रती शेतकरी म्हणूनच एकत्र आले पाहिजे. अन्यथा, लखीमपूरच्या घटनांना वारंवार सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येईल. शेतकरी समाज देशातील एक मोठे कुटुंब आहे. मोक्ष प्राप्तीसाठी अस्थी विसर्जन ही कौटुंबीक क्रिया असून, कुटुंब या नात्यानेच हा विधी करीत आहे.’’ विधिवत पूजनानंतर शैलेश अग्रवाल व विनायक पाटील यांनी वारकऱ्यांसह चंद्रभागा नदीत शेतकरी व पत्रकाराच्या अस्थींचे विसर्जन केले.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...