agriculture news in marathi Impact of above average rainfall on crops in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाचा पिकांवर परिणाम

डॉ. कैलास डाखोरे, यादव कदम, रामकृष्ण माने
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून मुख्यत्त्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाची वाढ व विकास होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान हा हवामान घटक खूप महत्त्वाचा आहे.

मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून मुख्यत्त्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाची वाढ व विकास होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान हा हवामान घटक खूप महत्त्वाचा आहे.

मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून मुख्यत्त्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाची वाढ व विकास होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान हा हवामान घटक खूप महत्त्वाचा आहे. सुमारे ५० टक्के उत्पादन हे पर्जन्य या घटकावर अवलंबून आहे. पर्जन्यमान हे शेती व पिकासाठी नेहमी फायद्याचा समजला जात असला तरी सरासरीपेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होतो.

मराठवाड्याचे हवामान

 • सर्व साधारणपणे कोरडे ते उष्ण.
 • वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१४.२ मिमी तर सरासरी खरीप हंगामातील (जून ते सप्टेंबर) ६७८.९ मिमी आहे.
 • एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी जवळपास ८० ते ८५ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो.

दहा वर्षातील खरीप हंगामातील महिनानिहाय पर्जन्यमान 
मराठवाड्यातील मागील दहा वर्षातील (२०१० ते २०१९) खरीप हंगामातील पर्जन्यमानाचा अभ्यास केला असता,

 • दरवर्षी मासिक पर्जन्यमानाचे वर्गीकरण वेगवेगळे आढळून येते.
 • खरीप हंगामातील पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अधिक आढळून येतो.
 • जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३४.० मिमी असून, २०१३, २०१६, २०१७ व २०१८ या वर्षात पर्जन्यमानाची नोंद सरासरीपेक्षा अधिक तर बाकी वर्षात सरासरीपेक्षा कमी आढळते.
 • जुलै महिन्यातील सरासरी पर्जन्यमान १८६.२ मिमी असून, २०१०, २०११, २०१३ व २०१६ ही वर्षे वगळता बाकी वर्षात पर्जन्यमानाची नोंद ‘सरासरीपेक्षा कमी’ अशी नोंद झाली आहे.
 • ऑगस्ट महिन्यात २०१०, २०११ व २०१७ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाल्याचे आढळते.
 • सप्टेंबर महिन्यात २०१६ व २०१९ ही वर्षे वगळता इतर वर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
 • खरीप हंगामातील सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मिमी असून मागील दहा वर्षातील (२०१० ते २०१९) कालावधीत २०१०, २०१३ व २०१६ ही वर्षे वगळता बाकी वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

यावर्षीचे हवामान व पर्जन्यमान स्थिती
यावर्षी मराठवाड्यात १२ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले. काही तालुके वगळता १४ जूनपर्यंत मॉन्सूनने संपूर्ण मराठवाडा व्यापला. जून ते ऑगस्ट या कालावधीत मराठवाड्यात आकाश ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. एकंदरीत यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरी इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली. या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा असून खरीप पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, या वर्षी सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पर्जन्यमानाची (सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची) नोंद झाली. (तक्ता क्र. १). मराठवाड्यातील खरीप हंगामातील पर्जन्यमानाची नोंद पाहिल्यास नांदेड जिल्हा सरासरीच्या उणे २.२ टक्के, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी इतका तर इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

अतिपावसाचे परिणाम, समस्या आणि उपाययोजना 

 • मागील तीन महिन्यात सतत ढगाळ वातावरण, दमट हवा व अति पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, पिके व फळबागांमध्ये किडी व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
 • जास्त पावसामुळे पिकात पाणी अधिक काळ साचून राहिले. परिणामी पिके काही प्रमाणात पिवळी पडून आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. शेती व फळबागांमध्ये पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात.
 • शेतात पाणी साचल्यामुळे पिकांना जमिनीतून अन्नद्रव्ये मिळण्यास अडचण होत आहे. अशा वेळी विद्राव्य खतांची फवारणी करून अन्नद्रव्यांची पूर्तता करावी.
 • पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. उघडीप मिळताच आंतरमशागतीची कामे करून पीक तणमुक्त करावे.
 • संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान व हवेत अधिक आर्द्रता इ. घटकामुळे कपाशी बोंडे सडणे तर सोयाबीन पिकाच्या शेंगांना मोड फुटणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.

संपर्क -डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२
(अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...