Agriculture news in marathi Impact of 'Corona' on vegetable prices in Kolhapur | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात भाजीपाला बाजारावर परिणाम झाला. अपवादवगळता बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर राहू शकले नाहीत.

कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात भाजीपाला बाजारावर परिणाम झाला. अपवादवगळता बहुतांशी भाजीपाल्याचे दर स्थिर राहू शकले नाहीत. ओली मिरची, घेवडा, ओला वटाणा आदी भाजीपाल्याचे दर इतर भाजीपाल्याच्या तुलनेत समाधानकारक स्थितीत होते. ओली मिरचीस दहा किलोस किमान १०० ते कमाल २५०, घेवड्यास दहा किलोस २०० ते २५०, ओला वाटाण्यास दहा किलोस २५० ते ४०० रुपये दर मिळाला. स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री होणारा बराचसा भाजीपाला येथील बाजार समितीत आला. यामुळे नियमित भाजीपाल्यापेक्षा येथे भाजीपाल्याच्या आवकेत वाढ होती. 

जितक्‍या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होती. तितकी मागणी नसल्याने दरात वाढ होवू शकली नाही. गवारीची तीनशे ते चारशे पाट्या आवक राहिली. गवारीस दहा किलोस किमान १०० ते कमाल ३०० रुपये दर होता. भेंडीची चारशे ते पाचशे पाट्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते १८० रुपये दर मिळाला. दोडक्‍यास दहा किलोस ५० ते १५० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची पस्तीस ते चाळीस हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ६०० रुपये दर होता. 

ऐन लग्नसराईच्या काळातही कोथिंबिरीची तेजी टिकू शकली नाही. कोरोनामुळे लग्नसमारंभ, मोठे महोत्सव रद्द झाल्याने या सर्वांचा एकत्रित परिणाम कोथिंबिरीच्या मागणीवर झाला. यामुळे मागणीत मोठी घट झाल्याचे भाजीपाला विभागातील सूत्रांनी सांगितले. 

लिंबांची दीड हजार पोत्यांची आवक

पालक, पोकळा, शेपूस शेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाला. फळांमध्ये लिंबूची एक ते दीड हजार पोत्यांची आवक झाली. प्रती पोत्यास किमान १०० ते कमाल ४०० रुपये दर होता. द्राक्षाची सहाशे ते सातशे बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १० ते ३० रुपये दर होता. डाळिंबास किलोस २० ते ८० रुपये दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...
पुणे जिल्हयातील बहुतांश कृषी सेवा...पुणे  ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
पावसामुळे रब्बी पिके तसेच हळदीचे नुकसाननांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक...
सांगलीत विम्याचे पैसे परस्पर कर्जापोटी...आटपाडी, जि. सांगली  : तालुक्यातील डाळिंब...
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन...पुणे  : पुणे जिल्हा परिषदेच्या २०२०-२१ च्या...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक: जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ...
कोल्हापुरात व्हाट्सॲपवरून शेतमाल ...कोल्हापूर: कोरोनाच्या संचारबंदीमुळे निर्माण...
मुंबई बाजार समितीत किरकोळ व्यापाऱ्यांना...मुंबई: मुंबई बाजार समिती प्रशासनाकडून रोज नवनवीन...
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
‘कोरोना’ आणि पावसामुळे संत्रा झाडालाच शेलगाव, जि. वाशीम : वाशीम तालुक्यातील शेलगाव घुगे...
लातुरात किराणा दुकानांतून होणार...लातूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सरकारने लागू...
परभणी : रेल्वे सेवा बंदचा लिंबू...परभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गामुळे रेल्वे...
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...