agriculture news in Marathi impact on cotton procurement of govt. Maharashtra | Agrowon

शासकीय कापूस खरेदीवर परिणाम

चंद्रकांत जाधव
बुधवार, 6 जानेवारी 2021

खानदेशात सुमारे २६ लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी विविध केंद्रांमध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात खरेदी रखडत झाली.

जळगाव ः खानदेशात सुमारे २६ लाख क्विंटल कापसाची शासकीय खरेदी विविध केंद्रांमध्ये झाली आहे. गेल्या आठवड्यात खरेदी रखडत झाली. त्यामुळे आवक कमी झाली असून, एका केंद्रात रोज फक्त दोन ते अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी किंवा आवक झाली आहे. 

डिसेंबरच्या मध्यापर्यंत कापसाची आवक सर्वच केंद्रांमध्ये वेगात सुरू होती. कापूस महामंडळ (सीसीआय), पणन महासंघाची खरेदी जळगाव, धुळे व नंदुरबारात सुरू आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात प्रतिदिन सरासरी चार हजार क्विंटल कापसाची आवक एका केंद्रात झाली. चोपडा (जि.जळगाव) येथील एका खरेदी केंद्रातील कापसाला आग लागली होती.

यामुळे ‘सीसीआय’ने एका केंद्रात रोज फक्त अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी करा, खरेदी केंद्रात कापसाचे ढीग तयार होवू देवू नका, खरेदीनंतर प्रक्रियेला वेग द्यावा आणि कापूस गाठी, सरकीचा साठा व्यवस्थित, सुरक्षित करावा, अशा सूचना दिल्या होत्या. यातच खरेदी करताना दुय्यम दर्जाच्या कापसाचा दर देण्यास ‘सीसीआय’ने सुरवात केली.

डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर खानदेशात विविध केंद्रांमध्ये सुमारे चार लाख क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढे ‘सीसीआय’कडील आवक आणखी कमी होईल, अशी स्थिती आहे.

यामुळे खरेदी केंद्रांकडे पाठ

  • कापसाला ५५५० ते ५६१५ रुपये दर
  • वाहनांच्या रांगा, वाहतूक खर्च अधिक
  • हमाली, तोलाईची कटती
  • मोजमापास होणारा उशीर

इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...