Agriculture news in Marathi The impact of the crop should be studied due to the changing climate | Agrowon

बदलत्या हवामानामुळे पिकांवरील परिणामाचा अभ्यास व्हावा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. किंबहुना विविध पिकांवरील संशोधनामध्ये हवामान बदलाचा अभ्यास हा प्राधान्याचा झाला आहे. या उद्देशाने कृषी विद्यापीठानेही आता पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात लिची, किनोवा, ड्रॅगनफ्रूट, बांबू यांसारख्या सहा पिकांची निवड करून या पिकांवर परिणाम करणाऱ्या वातावरणाचा अभ्यास सुरू केला आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी दिली. 

सोलापूर ः सातत्याने बदलणारे हवामान आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, याचा आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. किंबहुना विविध पिकांवरील संशोधनामध्ये हवामान बदलाचा अभ्यास हा प्राधान्याचा झाला आहे. या उद्देशाने कृषी विद्यापीठानेही आता पावले उचलली आहेत. पहिल्या टप्प्यात लिची, किनोवा, ड्रॅगनफ्रूट, बांबू यांसारख्या सहा पिकांची निवड करून या पिकांवर परिणाम करणाऱ्या वातावरणाचा अभ्यास सुरू केला आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी दिली. 

सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्र, अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैदराबाद आणि अखिल भारतीय समन्वित कृषी हवामान संशोधन प्रकल्प, सोलापूर यांच्या वतीने सोलापुरात बुधवार (ता. ४) ते शुक्रवार (ता. ६) दरम्यान तीनदिवसीय हवामान शास्त्रज्ञांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्‍घाटन डॉ. गडाख यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय डाळिंब केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा, कोरडवाहू शेती प्रकल्पाचे संचालक डॉ. पी. विजयकुमार, विभागीय संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय अमृतसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, डॉ. हनुमंत घाडगे या वेळी उपस्थित होते.  

डॉ. गडाख म्हणाले, की पावसाचे दिवस कमी होत आहेत. हवामानातील बदल गतीने वाढत आहेत. प्रतिकूलतेतही शाश्‍वत पीकपद्धती देण्याचे आव्हान सर्व शास्त्रज्ञांसमोर आहे. त्याच अनुषंगाने या कार्यशाळेत चर्चा व्हावी, शेतकऱ्यांची गरज आणि त्या-त्या भागातील नैसर्गिक परिस्थितीनुसार शिफारशी द्यायला हव्यात, महात्मा फुले कृषी विद्यापीठही त्या अनुषंगाने काम करत आहे.

या वेळी डॉ. पी. विजयकुमार यांनीही बदलत्या हवामानावर चिंता व्यक्त करत शास्त्रज्ञांनी आपली मते, शिफारशी मांडाव्यात, असे आवाहन केले. डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी डाळिंब आणि हवामानाचा संबंध या अनुषंगाने काही प्रश्‍न उपस्थित केले. प्रास्ताविक प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अमृतसागर यांनी केले. डॉ. डी. व्ही. इंडी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. घाडगे यांनी आभार मानले.

निवडक १०० शास्त्रज्ञांचा सहभाग
या तीनदिवसीय कार्यशाळेत आंध्र, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब आदी राज्यांतील निवडक १०० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. भारतातील बदलते हवामान, त्याचा विविध पिकांवर होणारा परिणाम आणि त्याकरिता योग्य उपाययोजना या विषयावर यामध्ये मंथन होणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...