तुटपंज्या कर्मचाऱ्यांमुळे पाटपाणी वितरणावर परिणाम

गिरणा पाटबंधारे विभागात ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील तब्बल ३१२ पदे अनेक रिक्त आहेत. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. गेल्या १० वर्षांपासून कर्मचारी भरतीच झालेली नाही.
Impact of flooding due to shortage of staff
Impact of flooding due to shortage of staff

भडगाव, जि. जळगाव : गिरणा पाटबंधारे विभागात ५१९ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यातील तब्बल ३१२ पदे अनेक रिक्त आहेत. त्यामुळे गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या पाण्याचे नियोजन करताना अधिकारी अन् कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. गेल्या १० वर्षांपासून कर्मचारी भरतीच झालेली नाही.

निम्म्या जळगाव जिल्ह्याला गिरणा धरणातून पाणी पाणीपुरवठा होतो. ६९ हजार ३५० हेक्टर क्षेत्र धरणाच्या पाण्यावर भिजते. गिरणा पाटबंधारे विभागात विविध ५१९ पदे मंजूर आहे. एकेकाळी ही पदे शंभर टक्के भरलेली होती. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे कर्मचारी रिक्त झाल्यावर त्यांच्या जागी कर्मचाऱ्याची नियुक्तीच झाली नाही. त्यामुळे रिक्त पदाचा आकडा वाढला आहे. शासन ही पदे भरण्याबाबत एक भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे अवघ्या १९८ कर्मचाऱ्यांच्या खाद्यांवर ५१९ जणांचा कार्यभार आहे. पर्यायाने अतिरिक्त कामांमुळे कामात ढिसाळपणा येत असल्याचे चित्र आहे. रिक्त पदे केव्हा भरली जातील, असा प्रश्न असा प्रश्न उपस्थित  आहे.

गिरणा प्रकल्पाचे एकूण चार मुख्य कालवे आहेत. त्यात जामदा डावा कालवा हा ५६.३६ किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्यावर ४१८ किलोमीटर लांबीच्या वितरिका आहेत. जामदा उजवा कालवा हा ३२.१८ किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्या २५० किलोमीटर लांबीच्या पाटचाऱ्या आहेत. तर निम्न गिरणा कालवा हा ४५.५ किलोमीटर लांबीचा असून ४९२ किलोमीटर लांबीच्या वितरिका आहेत. तर पांझण डावा कालवा हा ५३.२० किलोमीटर लांबीचा आहे. त्यावर ३१७ किलोमीटरच्या पाटचाऱ्या आहेत. म्हणजे १ हजार ६६४ किलोमीटर लांबीचे कालवे व पाटचाऱ्या आहे. प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कालव्याची रखवाली करण्याची वेळ आली आहे.

पाणीचोरीवर नियंत्रण मिळवणे होते अवघड तुटपुंज्या कर्मचारी संख्येमुळे गिरणा धरणाच्या कालव्यांना पाणी सोडल्यावर लक्ष ठेवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. पाणी चोरी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवणे अवघड  होते. त्यामुळे गिरणा पाटबंधारे विभाग अक्षरशः हतबल होऊन गेला आहे. कार्यरत कर्मचारी पाण्याचे आवर्तन सुटताच घामाघूम झाले आहे. शासनाने रिक्त पदे भरण्याबाबत तत्काळ भूमिका घेणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभाग महत्त्वाचा आहे. रिक्त पदामुळे शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गिरणा पाटबंधारे विभागातील रिक्त पदामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ही पदे आवश्यकबाब म्हणून तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आपण जलसंपदा मंत्र्याची भेट घेऊन करणार आहोत. - किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com