Agriculture news in Marathi Impact of 'October Heat' in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 ऑक्टोबर 2021

राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत आहे.

पुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने काही ठिकाणी ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवत आहे. तर रात्रीच्या किमान तापमानात मात्र हळूहळू घट होत आहे. आज (ता. २२) कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर गुजरातपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच कोमोरीन परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.राज्याच्या कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार होत आहे. गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी कमाल ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. काही ठिकाणी तापमान ३३ अंशांपार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. तर अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा २० अंशांच्या खाली आला असल्याने पहाटे गारठा जाणवत आहे. महाबळेश्‍वर येथे राज्यातील नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक हवामान
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचा निरोप घेतला आहे. देशाच्या उर्वरित भागातून मॉन्सून परतण्यास पोषक हवामान झाले आहे. उद्यापर्यंत (ता. २३) गोवा, ईशान्य आणि पूर्व भारतासह देशाच्या आणखी काही भागातून मॉन्सून परतण्याचे संकेत आहेत. तर मंगळवारपर्यंत (ता. २६) मॉन्सून देशाचा निरोप घेणार असून, दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.६ (१७), नगर ३२.८ (२०.१), जळगाव - (१७.६), कोल्हापूर ३२.८ (२०.७), महाबळेश्वर २६.१ (१४.८), मालेगाव ३२.८ (२२), नाशिक ३२.० (१६.१), सांगली ३३.८ (१९.८), सातारा ३२.५(१८.५), सोलापूर ३४.४ (१७.४), सांताक्रूझ ३३.८ (२२.४), अलिबाग ३२ (२२.८), डहाणू ३२.१ (२४.३), रत्नागिरी ३२.४ (२३.२), औरंगाबाद ३१.८ (१६.२), नांदेड -(१८), उस्मानाबाद - (१८.४), परभणी ३२.८ (१८.९), अकोला ३२.८ (१९.६), अमरावती ३२.६ (१६.८), ब्रह्मपुरी ३५ (१८.६), बुलडाणा ३०.५ (१८), चंद्रपूर ३२.६ (२२.४), गडचिरोली ३२.४ (२२), गोंदिया ३३.२ (१९.६), नागपूर ३३.६ (१७.७), वर्धा ३२.८ (१९), वाशीम ३० (२०), यवतमाळ ३१ (१८).
 


इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
सेंद्रिय खतनिर्मिती तंत्रातून आंबा...रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्‍वर तालुक्यातील पोचरी...
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...