agriculture news in Marathi impact of tur import will not affect in long term Maharashtra | Page 2 ||| Agrowon

तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील 

अनिल जाधव
सोमवार, 22 मार्च 2021

सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन तूर आयातीला परवानगी दिली आहे. मात्र ही आयात लगेच होण्याची शक्यता नाही.

पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन तूर आयातीला परवानगी दिली आहे. मात्र ही आयात लगेच होण्याची शक्यता नाही. त्यातच देशांतर्गत घटलेले उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी उपलब्धता यामुळे आयातीचा दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. त्याचा दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यताही कमीच आहे, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. 

केंद्र सरकारने मोझांबिक मधून कराराप्रमाणे २ लाख टन आणि व्यापाऱ्यांना इतर देशांतून ४ लाख टन, अशी एकूण सहा लाख टन आयातीची परवानगी दिली आहे. देशांतर्गत बाजारात साधारण सप्टेंबरपासून ते नवीन तूर बाजारात येईपर्यंत तुटवडा जाणवत असतो. त्यामुळे सरकार दरवर्षी विदेशातून तूर आयात करून वाढलेल्या दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करते.

भारतात तूर आयातीसाठी आफ्रिकन देश महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र येथील तूर उत्पादन साधारण सप्टेंबर महिन्यात येते. त्यातच म्यानमारमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे निर्यात ठप्प झालेली आहे. तेथील परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी जाईल, असे जाणकार सांगतात. त्यामुळे तेथील तूर लगेच येण्याची शक्यताही कमीच आहे. 

आफ्रिकन देशांत सोयाबीन वाढण्याची शक्यता 
आफ्रिकन देशातून भारतात मोठ्या प्रमाणात तूर आयात होत असते. मात्र गेल्यावर्षी चीनने आफ्रिकेतून सोयाबीन मोठी खरेदी केली. सोयाबीनला चीनने पसंती दिल्याने शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडेच वाढण्याची शक्यता तेथील व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यातच तूर निर्यातीत शेतकऱ्यांऐवजी निर्यातदार आणि व्यापारी यांनाच जास्त लाभ होतो, अशी टीका शेतकरी करत असतात. या सर्व पार्श्‍वभूमीवर आफ्रिकन देशांत यंदा तुरीऐवजी सोयाबीन लागवड वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

देशातील मागणी पुरवठ्यात असंतुलन 
केंद्र सरकारने मागील महिन्यात प्रसिद्ध केलेल्या सुधारित अंदाजात देशात यंदा ३८.८ लाख टन तूर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र व्यापारी आणि दालमिल सूत्रांच्या मते देशात यंदा तूर उत्पादन ३५ ते ३८ लाख टनांच्या जवळपास राहील. देशात वार्षिक तूर वापर हा ४२ लाख टनांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठी तूट येण्याची शक्यता आहे. 

वर्षनिहाय तूर आयात (लाख टनांत) 
५.३१ 
२०१८-१९ 
४.५० 
२०१९-२० 
४.४० 
२०२०-२१ 
६* 
२०२१-२२ 
(* दिलेला आयात कोटा) 

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांचा माल हा १० जूनच्या आतच बाजारात येतो. त्यामुळे प्रत्यक्ष तूर आयातीला सरकार जूननंतरच परवानगी देईल असे वाटते. आता फक्त कोटा जाहीर केला आहे. आयात परवानगी देण्याच्या प्रक्रियेला साधारण दीड ते दोन महिने लागतील. त्यानंतर माल येईल आणि तोही टप्प्याटप्याने येईल. त्यामुळे दरावर त्याचा फार मोठा परिणाम होईल, असे वाटत नाही. 
- नितीन कलंत्री, तूर व्यापारी, लातूर 

केंद्र सरकारने आयात कोट्याप्रमाणे तूर आणि मूग आयातीला परवानगी दिली आहे. आयातीच्या या निर्णयामुळे तुरीचे दर निश्‍चितच कमी होतील परंतु ही स्थिती काळ राहिल आणि नंतर दर पुन्हा वाढतील. देशातील आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता तुरीचे दर दीर्घकाळ कमी राहण्याची शक्यता कमीच आहे. 
- सुरेश मंत्री, शेतमाल बाजार विश्‍लेषक 


इतर अॅग्रोमनी
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी १०,९००...नवी दिल्ली : देशातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी (...
सांगली बाजारात हळदीचे दर स्थिर सांगली ः गेल्या आठवड्यापासून हळदीचे दर स्थिर असून...
चीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार पुणे : शेंगदाण्याची बाजारात गेल्या वर्षीच्या...
राज्यात शिल्लक साखरेचा बोजा कायम कोल्हापूर : यंदाचा साखर हंगाम अंतिम टप्प्यात येत...
लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावरलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
हळदीच्या आवकेत वाढसांगली ः हळदीचा हंगाम सुरु झाल्यापासून सहा ते...
तूर आयातीचा परिणाम दीर्घकाळ कमीच राहील पुणे ः सरकारने वित्तीय वर्ष २०२१-२२ साठी ६ लाख टन...
राज्यातून २० लाख टन साखरनिर्यातीचे करार कोल्हापूर ः यंदा साखर उत्पादनाबरोबरच...
आयातीने तुरीच्या दरावर परिणाम शक्य पुणे ः उडीद आयातीला गेल्या आठवड्यात परवानगी...
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...