नाशिकमध्ये महापुरामुळे भाजीपाला आवकेवर परिणाम

नाशिकमध्ये महापुरामुळे भाजीपाला आवकेवर परिणाम
नाशिकमध्ये महापुरामुळे भाजीपाला आवकेवर परिणाम

नाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी, दारणा, गिरणा यांसह उपनद्यांना रविवारी (दि. ४) पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले होते. त्यामुळे त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी तालुक्यातील विक्रमी पावसामुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा हायवे, नाशिक-औरंगाबाद, नाशिक-कळवण या महामार्गांवरील वाहतुकीवर दिवसभर परिणाम झाला.

नाशिकसह मुंबईमध्ये पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले होते. मुंबईत व मुंबई उपनगरातदेखील पावसाची धुवाधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून पाठविला जाणाऱ्या भाजीपाल्याची वाहने अगदी तुरळक प्रमाणावर पाठविण्यात आली. शेतकऱ्यांनाही आपला शेतमाल बाजार समितीत आणण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले. फक्त कोथिंबीर व मेथी याच पालेभाज्या आल्या इतर फ्लभाज्यांची आवक झाली नसल्याचे दिसून आले. 

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून सोमवार (ता. ५) ७-८ वाहने शेतमालाची वाहने मुंबईसाठी रवाना झाली. सरासरी ही संख्या घटली असल्यानचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला दैनंदिन जवळपास ६० ते ७० चारचाकी वाहने भरून शेतमाल पाठवला जातो. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने नाशिक शहरातील तसेच मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरदेखील पाणी साचल्याने रस्ते सर्वच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झालीच नाही. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यातदेखील शेतमाल रवाना झाला नाही. केवळ गुजरात राज्यात सुमारे ५ ते ६ वाहने पालेभाज्या माल पाठविला असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोमवारी (ता. ५) बाजार समितीत फळभाज्यांची पंधरा तर सायंकाळी पालेभाज्यांची पाच टक्के आवक आली होती. पावसामुळे दैनंदिन लाखो रुपयांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम जाणवला असल्याचे नाशिक बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com