विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवा ः शरद पवार

 Impart scientific vision to students : Sharad Pawar
Impart scientific vision to students : Sharad Pawar

सातारा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजवली पाहिजे. हे आव्हान आपण स्वीकारून या क्षेत्रात गतीने काम केले पाहिजे. संशोधन व पेटंटमध्ये ‘रयत''चे विद्यार्थी यशस्वी झाले पाहिजेत’’, असे प्रतिपादन माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. 

रयत शिक्षण संस्थेतर्फे वर्ये (ता. सातारा) येथे उभारण्यात आलेल्या ‘रयत सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्‍टिव्हीटी सेंटर’चे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१४) करण्यात आले. त्यानंतर साताऱ्यातील रयत इंग्लिश मीडियम स्कूलचे अप्पासाहेब पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे नामकरण आणि इमारतीचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, प्रतिभा पवार, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णास्वामी सुब्रह्मण्यम, राजीव गंधी सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी कमिशनचे सचिव अनिल मानेकर, वरळी येथील नेहरू सायन्स सेंटरचे संचालक शिवप्रसाद खेणेद, सीनियर सायंटिफिक ऑफिसर डॉ. नरेंद्र देशमुख, राजीव गांधी सायन्स सेंटरचे डॉ. अरुण सप्रे, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘सायन्स सेंटर उभारण्याचा आपला विचार आता कृतीत आला आहे. जग कुठे चालले आहे, त्यांची नोंद घेऊन विद्यार्थ्यांत विज्ञानाविषयी आस्था रुजविण्याचा प्रयत्न संस्थेद्वारे केला जात आहे. त्यासाठी विज्ञान परिषद आयोजित केल्या. त्यातून मुले आता स्वतः प्रयोग करत आहेत. त्यांच्यात विश्‍वास निर्माण होत आहे. हे काम आता सर्व शाखांत सुरू करण्याचा प्रयत्न करूया.’’

"मी जगभर फिरतो. परदेशात गेल्यावर तेथील विद्यापीठांना भेट देतो. तेथे कोणती संशोधने सुरू आहेत, याची माहिती घेतो. अमेरिकेत शेतीच्या बाबतीतही प्राध्यापक, विद्यार्थी संशोधन करत असतात. त्याची पेटंट घेतात. यातील लाभाचा वाटा त्यांना मिळत असतो. या मार्गाने आपण गेले पाहिजे,’’ असेही पवार म्हणाले. 

डॉ. काकोडकर म्हणाले, "ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देण्याचे आव्हान रयत शिक्षण संस्थेने पेलले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन सर्वांना देणे हे आपले कर्तव्य आहे. विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांत जिज्ञासा निर्माण केली पाहिजे. त्यांच्या जिज्ञासेची पूर्तता शाळेत केली गेली पाहिजे.'' डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com