agriculture news in marathi, Implement the Central Plans: Jadhav | Agrowon

केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा : जाधव
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

बुलडाणा : केंद्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येतील. त्यामुळे त्यांचा विकास साधला जावू शकतो. त्यासाठी केंद्र पुरस्कृत सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

बुलडाणा : केंद्र शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित घटक, आर्थिक दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येतील. त्यामुळे त्यांचा विकास साधला जावू शकतो. त्यासाठी केंद्र पुरस्कृत सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)च्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे पाणी टंचाईचे संकट तीव्र होत आहे. अशा परिस्थितीत यंत्रणांनी टंचाईग्रस्‍त गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी काम करावे. राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गतची कामे प्राधान्याने पूर्ण करावी. गरचेच्या ठिकाणी त्वरित टँकर सुरू करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या प्रतीक्षा याद्यांवरील घरकुल देण्याची कार्यवाही तातडीने राबवावी. भूमी अभिलेख विभागाने रस्ते व सिंचन प्रकल्पांमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या गट क्रमांक, ७/१२ दुरूस्ती तातडीने करव्यात. प्रकल्पांत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या गट क्रमांक दुरुस्ती, ७/१२ दुरुस्ती, जमिन नोंदणी विषयक तक्रारी असतात. त्यांचा निपटारा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना जाधव यांनी दिल्या.

बैठकीत राष्ट्रीय पेयजल, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, एकात्मिक बाल विकास योजना, शालेय पोषण आहार कार्यक्रम, उज्ज्वला योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...