कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करा : राठोड

कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करा : राठोड
कृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करा : राठोड

वाशीम : निसर्गाच्या लहरीपणामुळे व वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. यामुळे सध्याची शेती तोट्यात चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हातात घेतला आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश असून, या गावांमध्ये प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. 

गुरुवारी (ता. १०) येथे आयोजित प्रकल्प तोंडओळख व रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय चौधरी, तहसीलदार बळवंत अरखराव, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर, संतोष वाळके, करडा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश डवरे यांची उपस्थिती होती.

 राठोड म्हणाले, राज्यातील १५ जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविला जाणार असून, याकरिता ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील सहा वर्षे या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू राहणार आहे. प्रकल्प राबविण्याची जबाबदारी संबंधित गावाच्या ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे. संबंधित गावाचे सरपंच हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. 

प्रकल्पाची माहिती कृषी विभागाने संबंधित ग्रामस्तरीय समितीला द्यावी. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या  प्रकल्पाच्या माध्यमातून कोणती कामे करता येतील, याची माहिती ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना द्यावी, असेही राठोड म्हणाले. गावसाने यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. एम. जे. अरगडे यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com