Agriculture news in Marathi Implement a plan with citizens at the center: Hasan Mushrif | Agrowon

नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबवा ः हसन मुश्रीफ

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021

सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता. ७) केले. 

पुणे ः राज्यातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी (ता. ७) केले. 

ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या विकासात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे प्रत्येक गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. विकासाचे अनेक विभाग जिल्हा परिषदेशी जोडले गेले आहेत. शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासातील अडचणी गतीने सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधान्य द्यावे.’’

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी योजना सुरू करून राज्याने देशासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगून मुश्रीफ म्हणाले, ‘‘२८ हजार कोटी रुपयांचा १५ वा वित्त आयोग आहे. यामध्ये ८० टक्के ग्रामपंचायत, १० टक्के जिल्हा परिषद व १० टक्के पंचायत समिती असा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेत राज्य शासनाने चांगली कामगिरी केली आहे.  ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून पथदर्शी काम झाले आहे. ही कार्यशाळा निश्‍चितपणे नवी दिशा देईल, असा विश्‍वास अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केला.

 तिजोरीत खडखडाट आणि परिषद पंचतारांकित हॉटेलमध्ये 
मंत्री मुश्रीफ यांनी राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून, विकास कामांना कात्री लावण्यात आल्याचे सांगत, जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तर ही परिषद ‘यशदा’सारख्या शासकीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये आयोजित करण्याऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित केल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दोन दिवस पंचतारांकित हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांसाठी आलिशान सूट आरक्षित करण्यात आले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...