यवतमाळ जिल्ह्यात ‘पोकरा’ची अंमलबजावणी करा

डझनभर योजना राबवूनही शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळवता आले नाही. अशा स्थितीत ‘पोकरा’ योजना काही अंशी आशावादी दिसत असल्याने या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सोळा ही तालुक्यांत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
Implement Pokra in Yavatmal district
Implement Pokra in Yavatmal district

यवतमाळ : डझनभर योजना राबवूनही शेतकरी आत्महत्यांवर नियंत्रण मिळवता आले नाही. अशा स्थितीत ‘पोकरा’ योजना काही अंशी आशावादी दिसत असल्याने या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील सोळा ही तालुक्यांत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

कृषिमंत्री दादा भुसे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. आत्महत्याप्रवण अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख. सिंचनाचा अभाव असलेल्या या  जिल्ह्यात शेतकऱ्यांची अवलंबिता केवळ कोरडवाहू पिकांवर आहे. त्यामुळे निसर्गाच्या भरवशावर असलेल्या या भागातील शेतीत उत्पादकता देखील बेभरवशाची असते.

उत्पादकता खर्चाची भरपाई देखील होत नसल्याने पुढच्या हंगामाचे नियोजन करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. जागतिक स्तरावर देखील यवतमाळची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्हा अशी ओळख निर्माण झाली आहे. या आत्महत्या नियंत्रणासाठी शासन, प्रशासनाकडून आजवर डझनभर योजना जाहीर करण्यात आल्या. त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही झाला. परंतु शेतकऱ्यांच्या हातात मात्र काहीच लागले नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशीच गत कृषी विषयक योजनांची नियोजनशून्य अंमलबजावणीमुळे झाली आहे. जिल्ह्यातील सोळा तालुक्यांत अंतर्गत असलेल्या ३०९ गावांमध्ये ‘पोकरा’ योजनेची अंमलबजावणी होत आहे.

संरक्षित शेतीला यातून प्रोत्साहन देण्यात आले आहे. जलसंधारण व संवर्धनाची कामे देखील यातून होत आहेत. लाभार्थी निवडीचे निकष व प्रक्रिया पारदर्शी आहे. योजनेचे अनुदान देखील डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यात वळते केले जाते. योजनेकरिता अर्ज करण्याची पद्धत देखील सोपी आणि सुटसुटीत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com