टंचाई स्थितीतील उपाययोजनांची अंमलबजावणी करा : पालकमंत्री कांबळे

टंचाई स्थितीतील उपाययोजनांची अंमलबजावणी करा : पालकमंत्री कांबळे
टंचाई स्थितीतील उपाययोजनांची अंमलबजावणी करा : पालकमंत्री कांबळे

हिंगोली ः जिल्ह्यात उद्भवलेल्या टंचाई स्थितीत प्रशासनाने नियोजन करुन उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रविवारी (ता. १३) आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, खासदार राजीव सातव, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. संतोष टारफे, रामराव वडकुते, विप्लव बजोरिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, समाजकल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण, आदिवासी प्रकल्प अधिकारी विशाल राठोड नियोजन समिती सदस्य यांची उपस्थिती होती. 

श्री. कांबळे म्हणाले, ‘‘ टंचाईसदृश स्थितीत उपाययोजना राबविण्याकरीता नियोजन करावे. टंचाईग्रस्तांना दिलासा द्यावा. टंचाईग्रस्त असलेले व नसलेल्या गावांचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे सादर करावेत.’’

जिल्हा नियोजन समितीच्या २०१९-२० च्या प्रारुप आराखड्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, सिंचन, जलसंधारण, ग्रामीण रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले. तसेच सर्व संबंधित विभागांनी २०१८-१९ मध्ये प्राप्त झालेला निधी योग्य नियोजन करुन वेळेत खर्च करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. २०१९-२० अंतर्गत विविध विभागांच्या योजनांसाठी २८९ कोटी रुपये मागणी केली होती. परंतु सर्वसाधारण वार्षिक योजनाकरीता ९८ कोटी ७४ लाख रुपये, तर अनुसूचित जाती उपयोजनाकरिता ५० कोटी ४७ लाख रुपये, अनुसूचित जमाती उपयोजनेतंर्गत २२ कोटी २० लाख ९ हजार रुपये मिळून एकूण १७१ कोटी ४१ लाख ९ हजार खर्चाच्या प्रारुप आराखड्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजना २०१८-२०१९ अंतर्गत डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत सर्वसाधारण योजनेअंतर्गत ४० कोटी ८२ लाख रुपये तर अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत १५ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाला. अनुसूचित जमाती आदिवासी उपयोजनेतंर्गत (ओटीएसपी) १९ कोटी रुपये खर्च झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com